Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Milk Rate Anudan Shasan Nirnay ] : राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाकरीता प्रतिलिटर रुपये 5 /- अनुदान देणेसंदर्भात राज्यातील कृषी व पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागांकडून दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील सहकारी दुध संघ तसेच खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिनांक 11.01.2024 ते दिनांक 10.02.2024 पर्यंत प्रतिलिटर रुपये 5/- अनुदान देण्याचा निर्णय पदुम विभागांकडून दिनांक 05.01.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे . दुध अनुदान योजनाच्या अंमलबजावणी करीता राज्याचे मंत्रीमंडळाच्या दिनांक 05 फेब्रवारी 2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे ..
सदर बैठकीमध्ये राज्यामधील सहकारी तसेच खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर रुपये 5/- इतके अनुदान देण्याच्या योजनेस पुढील दिनांक 11 फेब्रुवारी 2024 ते दिनांक 10.03.2024 पर्यत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . सर निर्णयाच्या अनुषंगाने दुध अनुदान योजनेकरीता दिनांक 11.02.2024 ते दिनांक 10.03.2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य शासनांच्या विचाराधीन होता .
यानुसार राज्य शासनांच्या पदुम विभागांकडून निर्गमित 14.07.2023 रोजीच्या शासन निर्णयातील सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर रुपये 5 /- इतके अनुदान योजनेच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून योजनेस दिनांक 11.02.2024 ते दिनांक 10.03.2024 या एका महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात येत आहेत .
सदरच्या योजनाकरीता एक महिन्यांच्या कालावधीकरीता रुपये 230 कोटी इतका निधी आवश्यक असणार आहेत .. या संदर्भात राज्य शासनांच्या पदुम विभागांकडून दिनांक 26.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..