Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ National Pension Scheme New Rules ] : राष्ट्रीय पेन्शन योजनांच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे , सदर बदलण्यात आलेले नियम दिनांक 01 एप्रिल 2024 पासुन लागु करण्यात येणार आहेत , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
राष्ट्रीय पेन्शन योजना विषयक नॅशनल पेन्शन सुविधा , पेन्शन फंड नियामक ( PFRDA ) मार्फत चालविण्यात येते . आता सदर संस्थाकडून राष्ट्रीय पेन्शन योजनांचे खाते अधिक सुरक्षित करण्याच्या हेतुने , दिनांक 01 एप्रिल 2024 पासुन वापकर्तांच्या टायर 01 व टायर 02 खात्यांमध्ये लॉग इन करण्याकरीता आधार संलग्नित ओटीपी घेतला जाणार आहे , ज्यामुळे आपण लॉग इन करताना आपल्या आधारला ॲड असलेल्या मोबाईल / ई-मेल वर ओटीपी येईल त्यानंतर आपणांस सदर ओटीपी टाकुन व्हेरिफिकेशन करुन लॉग इन करता येणार आहे .
पेन्शन फंड नियामक ( PFRDA ) मार्फत आता आधारवर आधारित लॉग इन पडताळणी करीता राष्ट्रीय पेन्शन योजनाचे सदस्यांच्या आधारशी लिंक करण्यात येणार आहेत . त्यानंतर आधार कार्डला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबर वर / ईमेल वर ओटीपी येईल , ते टाकुन लॉग इन करता येणार आहेत . हा महत्वपुर्ण बदल दिनांक 01 एप्रिल 2024 पासुन होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे .
आपण राष्ट्रीय पेन्शन खात्यांमधून पैसे कधी काढू शकतो ? :- आपण जर नॅशनल पेन्शन योजनांचे सदस्य असाल तर आपणांस नविन घर खरेदी करायचे असल्यास पैसे काढता येतील , तसेच मुलांच्या शिक्षण / लग्न कार्यासाठी पैसे काढता येणार आहेत . त्याचबरोबर वैद्यकीय आणीबाणी , नविन व्यवसाय / स्टार्टअप करीता तसेच कौशल्य विकास खर्च करीता तसेच अपघात झाला असेल अशा प्रसंगी आपण राष्ट्रीय पेन्शन खात्यांमधून पैसे काढू शकतो .