Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pension Ralated Shasan Nirnay ] : सेवानिवृतत कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरुन सेवा निवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करण्या विषय गठित अभ्यास समितीस अंतिम मुदतवाढ देणेबाबत राज्य शासनांच्या सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दिनांक 25 मे 1967 नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरुन सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करण्या विषयी सहकारी , पणन व वस्त्रोद्योग विभागांच्या दिनांक 26.06.2023 , दि.12.10.2023 व दि.31.01.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अभ्यास समिती गठीत करण्यात आलेले आहे . सदर अभ्यास समितीने शासनास अहवाल सादर करण्याची मुदत ही दिनांक 26.09.2023 रोजी संपुष्टात आली असल्याने दिनांक 12 ऑक्टोंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक 25 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली होती .
सदरची मुदत ही संपुष्टात आली असल्याने दिनांक 31 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ दिली होती , सदर अभ्यास समितीचे कामकाज हे अंतिम टप्यात असल्या कारणाने समितीला शासनास अहवाल सादर करण्याकरीता 02 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधिन होती .
यानुसार सदर शासन निर्णयान्वये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधून दिनांक 25 मे 1967 नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरुन सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करणे या विषयी धोरणात्मक निर्णय घेण्याकरीता दिनांक 26 जुन 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार गठित अभ्यास समितीचे कामकाज अंतिम टप्यात असल्याने , शासनास अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास समितीला 02 महिन्यांची म्हणजेच दिनांक 26 एप्रिल 2024 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून दिनांक 23.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.