Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra govt. Bound Sales ] : महाराष्ट्र राज्य शासनांकडून तब्बल 1500 कोटी रुपयांचे रोखी विक्रीस काढले आहेत , ज्याची मुदत ही 12 वर्षांची असणार आहे . ज्यांमध्ये अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार सदर रोख्यांची विक्री करण्यात येणार आहेत . यांमध्ये 10 टक्के रक्कम ही पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुक दारांना वाटप करण्यात येणार आहे .

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुंबई येथील कार्यालयांमध्ये लिलाव केला जाणार असून , सदर लिलाव पद्धत ही बिड्स ही दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी संगणकीय प्रणालीच्या माध्यमातुन आरबीआयच्या कोअर बँकिंग सोल्यूशन पद्धतीनुसार सादर करायचे आहेत . सदर बिड्स संगणकीय प्रणाली मार्फत ई-कुबेर पद्धतीनुसार सकाळी 10.30 ते 11.30 या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे .

सदरच्या कर्जरोख्याचा कालावधी ही 12 वर्षे इतका असून सदर कर्जे रोख्यांच्या कालावधी दिनांक 28.02.2024 पासुन सुरुवात होणार आहे . तर कर्जरोख्यांची परतफेड दिनांक 28.02.2036 रोजी पुर्ण किमतीने करण्यात येईल . सदर कर्जरोख्यांचा व्याजाचा दर हा लिलावांमध्ये विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढार असणार आहे . व्याजारे प्रदान प्रतिवर्षी माहे ऑगस्ट 28 आणि माहे फेब्रुवारी 28 रोजी सहामाही कालावधी नुसार करण्यात येणार आहे .

सदर कर्जरोख्यांचा कालावधी हा 12 वर्षे इतका असून रोखे कालावधी 28.02.204 पासुन सुरुवात होईल तर कर्जरोख्यांची परतफेड हि दि.28.02.2036 रोजी पुर्ण होईल . शासकीय रोख्यांमधील बँकाची गुंतवणुक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 नुसार कलम 24 अंतर्गत करण्यात येईल .तसेच सदरचे कर्जरोखे हे पुन : विक्री -खरेदी करीता पात्र असणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *