Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Monthely Pension Scheme gr ] : राज्य शासन सेवेतील स्वीयेतर सेवेत असणाऱ्या शसकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात द्यावयाचे मासिक निवृत्तीवेतन अंशदान / रजा वेतन अंशदान या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 22 फेब्रुवारी 2022 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
शासकीय कर्मचारी क्रियाशील स्वीयेत्तर सेवेत असताना त्या संबंधात द्याव्या लागणाऱ्या निवृत्तीवेतनाच्या अंशदानाचे दर व रजा वेतनाचे अंशदानाचे दर महाराष्ट्र नागरी सेवा यांमध्ये स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन , बडतर्फी व सेवा मधून काढून टाकणे , पदग्रहण अवधी यांच्या काळातील प्रदाने . नियम 1981 च्या परिशिष्ट 4 च्या नियम 6 मधील पोटनियम 1 आणि 2 मधील तक्त्यात विहीत करण्यात आले आहेत .
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी शासन अधिसूचना वित्त विभाग क्र.वेपुर 2019 दिनांक 30.01.2019 नुसार दिनांक 01.01.2016 पासुन सुधारित करण्याात आलेले आहेत . या वस्तुस्थितीमुळे व त्यानंतर इतर अनेक बदल घडून आल्याने , क्रियाशील स्वीयेत्तर सेवा मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या त्या कालावधी करीता द्यावे लागणाऱ्या निवृत्ती वेतनाच्या व रजा वेतनाच्या मासिक अंशदानाच्या दरांमध्ये सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या काही काळ विचाराधीन होता .
यानुसार आता राज्य शासनांने क्रियाशील स्वीयेतर सेवा मधील शासकीय कर्मचाऱ्यांचे संदर्भात मासिक रजा वेतन अशंदाना व निवृत्तीवेतन अंशदानाच्या परिगणनेसाठी वेतन या संज्ञेचा अर्थ महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 मधील नियम 3 ( 12) मध्ये दिलेल्या मुळ वेतनाच्या व्याख्येनुसार असणार आहेत . तसेच शासकयी कर्मचाऱ्यांचे क्रियाशील स्वीयेत्तर सेवा कालखंडात देय होणारे निवृत्तीवेतनाचे अंशदान , महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 च्या परिशिष्ट 4 मधील नियम सहा च्या पोटनियम एक मध्ये
प्रस्तावनेतील निर्णय दिनांक 01 ऑक्टोंबर 1983 नुसार नमुद केल्याच्या दराने कर्मचारी स्वीयेत्तर सेवा मध्ये जाताना त्याने धारण करण्यात आलेल्या पदाचे सध्याचे सुधारित वेतनश्रेणी मधील वेतन अथवा स्वीयेत्तर सेवा असताना त्याला एखाद्या पदावर प्रपत्र पदोन्नती देण्यात आली असेल तर त्या पदाच्या सुधारित वेतनश्रेणीमध्ये निश्चित करण्यात येणारे वेतन लक्षात घेवून त्या प्रमाणे पुर्वीप्रमाणेच परिगणीत करण्यात योवेत असा निर्णय देण्यात आला आहे .
त्याचबरोबर क्रियाशील स्वीयेत्तर सेवा मध्ये असताना रजा वेतनापोटी द्यावी लागणारी मासिक अंश दानाचे दर हे महाराष्ट्र राज्य नागरी सेवा नियम 1981 नुसार स्वीयेत्तर सेवा मध्ये मिळणाऱ्या वेतनाच्या 11 टक्के इतके असणार आहेत .त्याचबरोबर सदरचे ओदश सुधारित वेतन श्रेणी अंमलात आल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 01.01.2016 पासून अंमला येणार आहेत . मात्र प्रतिनियुक्तीवरील जे कर्मचारी तसे विकल्प देवून दिनांक 01.01.2016 नंतरही असुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन घेणे सुरु ठेवतील अशांच्या बाबत सदरचा आदेश त्यांच्या विकल्पानुसार अंमलात येणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच दिनांक 01.01.2016 पुर्वीपासून जे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर होते व ज्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी दिनांक 01.01.2016 पुर्वीपासून जे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर होते व ज्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी हा दिनांक 01.01.2016 च्या पुढेही चालु असणार किंवा वाढविण्यात येणार आहेत तसेच ज्यांना यापुढे प्रतिनियुक्तिवर पाठविले जाणार आहेत , त्या सर्वांच्या बाबत हे आदेश लागु असणार आहेत .
या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 22.01.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.