Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Asthayi Pade Mudatvadh Shasan Nirnay ] : राज्य शासन सेवेतील अस्थायी पदांना सेवेत मुदतवाढ देणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या वित्त विभाग शासन निर्णय दि.31.08.2023 नुसार सर्व प्रशासकीय विभाग यांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना त्याचबरोबर यापुर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतींबधात करण्यात आलेला नाही . अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक 29.02.2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले होते . आता सर्व प्रशासकिय विभागांची सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबतची कार्यवाही अद्याप पुर्ण झालेली नाही , ही बाब विचारात घेवून , पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहेत .
सदर शासन निर्णयानुसार सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना त्याचबरोबर यापुर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु, ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही , अशा अस्तित्वात असणाऱ्या सर्व अस्थायी पदांना दिनांक 01.03.2024 ते दिनांक 31.08.2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत .
सदर कालावधी मध्ये सर्व प्रशासकीय विभागांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयांच्या आस्थापनेवरील मंजूर पदांचा आढावा घेवून , सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे , यानंतर सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याकरीता कालावधी वाढून देण्यात येणार नसल्याची नमुद करण्यात आलेले आहेत .
यामुळे सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या आस्थापनेवरील पदांचा तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्रिय कार्यालयांच्या आस्थापनेवारील पदांचा आढावा घेवून , सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव तातडीने वित्त विभागास सादर करण्याचे नियोजन करण्याच्या सुचना देण्यात आलेले आहेत .
यापुढे अस्थायी पदांना सुधारित आकृतीबंधात समावेश करण्याबाबतची कार्यवाही सर्व प्रशासकीय विभागांनी तातडीने करावयाची आहे , अस्थायी पदांची मुदतवाढ ही शेवटची मुदतवाढ समजण्यात यावी व त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत . या संदर्भातील वित्त विभागांकडून दि.21.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.