Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Emplpoyee Ashvasit Pragati Yojana ] : 7 व्या वेतन आयोगांमध्ये देण्यात येणाऱ्या 03 लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना बाबत निर्गमित दि.02 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये सुधारणा करणेबाबत वित्त विभागांकडून दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
वित्त विभागाच्या दिनांक 02 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्र. Vi) वगळण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती , सदर शासन शुद्धीपत्रकानुसार वित्त विभागाच्या दिनांक 02.03.2019 रोजीच्या निर्णयातील परिच्छेद क्र.vi) विवक्षित सेवा कालावधीच्या नंतर संबंधित पदाच्या कर्तव्ये तसेच जबाबदारीत वाढ न होता , अकार्यात्मक तसेच तत्सम उच्च वेतन संरचनेचा मंजूर करण्यात आलेला / येणारा लाभ या योजना खालील पहीला लाभ येईल .
उदा . राज्य शासनांच्या मंत्राय तसेच विधानमंडळ सचिवालय कक्ष अधिकाऱ्यांना चार वर्षांच्या नियमित सेवा कालावधी नंतर देण्यात येत असणारी अकार्यात्मक वेतन संरचना .
ज्या कर्मचारी /अधिकारी यांना पहिला लाभ म्हणून ज्या पदाची वेतन संरचना मंजूर करण्यात आलेली आहे , त्या पदाकरीता विवक्षित सेवेच्या कालावधीनंतर त्या पदाच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्यांमध्ये वाढ न होता , अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना हा दुसरा लाभ म्हणून मंजुर करण्यात येईल . हे पुर्णत : वगळण्यात येत आहे . या बाबतचे शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.21.02.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
दिनांक 01.04.2010 रोजीच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनांमध्ये देखिल सुधारणा करणेबाबत वित्त विभागांकडून शासन निर्णय निर्गमित GR दि.21.02.2024
वित्त विभागाच्या दिनांक 01 एप्रिल 2010 रोजीच्या शासन निर्णयांमधील परिच्छेद क्र.2 ब (३) विवक्षित सेवेच्या कालावधी नंतर संबंधित पदाच्या कर्तव्ये व जबाबदारीत वाढ न होता , अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचनेचा मंजूर करण्यात आलेला / येणारा लाभ हा या योजने खालील पहिला लाभ समजण्यात येईल , जसे कि मंत्रालय / विधानमंडळ सचिवालयातील कक्ष अधिकाऱ्यांना चार वर्षांच्या नियमित सेवा कालावधी नंतर देण्यात येत असणारी अकार्यात्मक वेतन संरचना हा परिच्छेद पुर्णत : वगळण्यात येत आहेत .
त्याचबरोबर वित्त विभगाच्या दिनांक 01.04.2010 रोजीच्या निर्णयातील परिच्छेद क्र.2 (क) 1 मधील तसेच या योजना मधील पहिला लाभ म्हणून ज्या पदाची वेतन संरचना मंजूर करण्यात आलेली आहे , त्या पदाला विवक्षित सेवेच्या कालावधी नंतर त्या पदाच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्यांत वाढ न होता , अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकार्यात्मक किंवा तत्सम उच्च वेतन संरचना दुसरा लाभ म्हणून मंजूर करण्यात येईल हे वाक्य वगळण्यात येत आहे . असे शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन शुद्धी पत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.