Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ lic New Amrut Bal Policy ] : भारतीय आयुर्विमा कंपनीकडून नविन एलआयसी अमृत बाल पॉलिसी लाँच केली आहे , ज्यांमध्ये मुदतीनंतर किमान 2 लाख रुपये ते 24 लाख रुपये पर्यंत आर्थिक लाभ मिळणार आहे . या पॉलिसी बद्दल संपर्ण माहिती पुढीलप्रमाणे घेवूयात ..
ही पॉलिसी योजना खास करुन मुलांच्या उच्च शिक्षणासाठी व इतर गरजा पुर्ण करण्याकरीता डिझाईन करण्यात आलेली आहे . या पॉलिसी योजना अंतर्गत 5,6,7 वर्षांच्या प्रिमियम मुदतीसह / एकरकमी प्रिमियम भराला जावू शकतो . तसेच प्रस्तावकांना मृत्युवर विमा रक्कम निवडण्याचा पर्याय असणार आहे .यासाठी मुलांचे वय 0 वर्षे किंवा 30 दिवस पुर्ण झाल्यानंतर या पॉलीसी करीता पात्र ठरतो . तर या पॉलीसी योजना अंतर्गत कमाल वय हे 13 वर्षे असणार आहेत .
इतर काही खास वैशिष्ट्ये / अटी व निर्बंध : यांमध्ये मॅच्युरिटीच्या वेळी मुलाचं किमान वय ह 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे असणार आहेत . यांमध्ये किमान पॉलिसी टर्म हे मर्यादित प्रिमियम पेमेंट मध्ये 10 वर्षे तर सिंगल प्रिमियम मध्ये किमान पॉलिसी टर्म हे 05 वर्षे असणार आहेत .तर कमाल पॉलिसी टर्म मर्यादित प्रिमियम पेमेंट मध्ये 25 वर्षे तर सिंगल प्रिमियम पेमेंट मध्ये 25 वर्षे असणार आहेत .
तर प्रिमियम पेमेंट टर्म 5,6,7 वर्षे इतका असणार आहेत , तर किमान पॉलिसी विमा रक्कम ही 2,00,000/- रुपये इतकी असणार आहे . कमाल विमा रक्कमेला मर्यादा नाही . कमाल विमा रक्कम ही 2 लाख रुपयांच्या पटीत असणार आहे .
मृत्यु लाभ :
प्रीमियम पेमेंट | पर्याय | मृत्यूवर विम्याची रक्कम |
मर्यादित प्रीमियम पेमेंट | पर्याय I | • वार्षिक प्रीमियमच्या ७ पट जास्त ; किंवा • मूळ विमा रक्कम |
पर्याय II | • वार्षिक प्रीमियमच्या 10 पट जास्त ; किंवा • मूळ विमा रक्कम | |
सिंगल प्रीमियम पेमेंट | पर्याय III | सिंगल प्रीमियमच्या • 1.25 पट जास्त ; किंवा • मूळ विमा रक्कम |
पर्याय IV | सिंगल प्रीमियमच्या 10 पट |
हप्ता भरण्याच्या पद्धतीनुसार किमान हप्त्याची रक्कम :
हप्ता भरण्याची पद्धत | किमान हप्त्याची रक्कम |
मासिक | रु. ५,०००/- |
त्रैमासिक | रु. १५,०००/- |
अर्धवार्षिक | रु. २५,०००/- |
वार्षिक | रु. ५०,०००/- |
या पॉलिसी बाबत सविस्तर अधिक माहितीसाठी CLICK HERE