Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme ] : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ लागु करणेबाबत , गठीत समितीने काही शिफारशी राज्य शासनांस दिल्या आहेत . सदरच्या शिफारशीवर येत्या अधिवेशानांमध्ये चर्चा होवून , निर्णय घेतला जाणार आहे .
सेवानिवृत्त माजी अतिरिक्त मुख्य सचिव श्री.सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ लागु करणेबाबत , अहवाल / शिफारशी तयार करण्याच्या कामासाठी समिती गठीत करण्यात आलेली होती . सदर समितीने काही शिफारशी राज्य शासनांस दिलेल्या आहेत . यांमध्ये जुनी पेन्शन जशास तसे न देता , राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये काही अंशी बदल करण्याची शिफारशी देण्यात आलेल्या आहेत .
समितीने केलेल्या प्रमुख शिफारशी : राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी देय असणारे वेतनाच्या 50 टक्के रक्कम निवृत्तीवेतन डी.ए ( महागाई भत्तासह ) लागु करण्यात यावेत .. राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये सरकारकडून देण्यात येणारे 14 टक्के योगदान त्याचबरोबर कर्मचाऱ्यांकडून घेतले जाणारे 10 टक्के अंशदान हे कायम ठेवण्यात यावेत . तर कर्मचाऱ्यांचे योगदान हे कर्मचाऱ्यांस व्याजासह परत करण्याची तरतुद असावी .
सध्या जुनी पेन्शन असणाऱ्यांनाच भविष्य निर्वाह निधी ही योजना सुरु आहे , तर आता NPS धारकांसाठी देखिल स्वेच्छाधिकार देवून भविष्य निर्वाह निधी ही योजना सुरु करण्यात यावीत . तर कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाल्यास ,कर्मचाऱ्यांस मृत्य वेळी मिळणाऱ्या अंतिम वेतनाच्या 60 टक्के अथवा कमीत कमी 10,000/- एवढे रक्कम कुटुंब निवृत्तीवेतन म्हणून अदा करण्यात यावेत , अशी शिफारस करण्यात आलेली आहे .
अर्थसंकल्पांमध्ये निर्णय हाणेबाबत , मुख्य सचिवांचे आश्वासन : येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनांमध्ये , जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेले होते . या पार्श्वभुमीवर दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी कर्मचाऱ्यांच्या संघटना प्रमुखांची जुनी पेन्शनच्या विषयावर राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली , यांमध्ये मुख्य सविवांनी सांगितले कि , मुख्यमंत्री यांच्या आश्वासनानुसार येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनांमध्ये जुनी पेन्शन बाबत सकारात्मक निर्ण्य घेण्यात येईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.