Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Age 60 Years ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्यास विरोध होत आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय हे वाढवून 60 वर्षे करण्याची मोठी मागणी बऱ्याच दिवसांपासून होत आहे . या बाबत राज्याचे विधानसभा सदस्य श्री.जयंत राजाराम पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वरुन 60 वर्षे करण्यास विरोध दर्शविला आहे . या संदर्भातील सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे पाहुयात .

सदरचा पत्र हा दिनांक 16.02.2024 रोजी मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेला असून , सदर पत्रांमध्ये मा.जयंत पाटील यांनी नमुद केले आहेत कि , राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वरुन 60 वर्षे पर्यंत वाढविण्यात येत असल्याचे वृत्त समजले . या संदर्भात नमुद करण्यात येते कि राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय हे वाढवून साठ वर्षे केल्याने आगामी 02 वर्षात शाससन सेवेमधून सेवानिवृत्त होणाऱ्याकर्मचाऱ्यांची संख्या कमी होईल .

ज्यामुळे नविन बेरोजगार कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी होईल , पर्यायाने बेरोजगारीचे प्रमाणे अधिक होईल . सध्या राज्य कर्मचारी यांयना पदोन्नतीमध्ये मोठ्या प्रमाणात कुंठीतता आल्याने राज्य शासनांस आश्वासित प्रगती योजनाचा लाभ द्यायवा लागतो , ज्यांमध्ये सेवानिवृत्तीचे वय अजून वाढविल्यास कुंठीततेमध्ये वाढ होवून कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही .

सध्य स्थितीमध्ये सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना नियम कालिक वेतनवाढ मिळाल्याने त्यांचे मासिक वेतन जास्त आहेत , त्यांच्याऐवजी नविन नियुक्त असणारे अधिकारी / कर्मचारी यांना शासनास कमी वेतन द्यावे लागेल . यामुळेच शासनास वेतनावर होणाऱ्या खर्चावर बचत होईल .त्याचबरोबर दोन वर्षानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आणखीव वाढ होवून निवृत्तीवेतन व इतर आर्थिक लाभ करीता खर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल .

तर राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्याचा अन्यायकारण निर्णय घेण्यात येवू नयेत अशी विनंती सदर पत्रांमध्ये मा.जयंत पाटील यांनी केलेली आहे . या संदर्भात मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेला सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *