शेतकऱ्यांसाठी पोस्टाची खास गुंतवणुक योजना ,115 महिन्यांत पैसे होईल दुप्पट !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farmer Best Investment Plan ] : पोस्ट ऑफीस मध्ये शेतकऱ्यांसाठी खास योजना राबविण्यात येते , या योजना अंतर्गत फक्त 115 महिन्यांत गुंतवणुक रक्कम चक्क दुप्पट होते , यामुळे शेतकऱ्यांनी या पोस्टाच्या योजनेत गुंतवणुक करणे अधिक फायदेशिर असणार आहेत .  

किसान विकास पत्र : या योजनेची सुरुवात ही भारत सरकारच्या पोस्ट ऑफीस अंतर्गत सन 1988 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे , सदर योजना अंतर्गत एकरकमी गुंतवणुक करणे आवश्यक ठरते ,सर्वप्रथम ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठीच सुरु करण्यात आलेली होते , परंतु आता या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आलेली असून , पात्रता पुर्ण करणारा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेवू शकतात .

आवश्यक पात्रता : या योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय रहिवासी असणे आवश्यक असणार आहेत , तसेच अर्जदाराच्या किमान वय हे 18 वर्षे पेक्षा जास्त असणे आवश्यक असणार आहेत , तसेच अल्प वयीन व्यकतीच्या नावे प्रौढ अर्ज सादर करु शकतो .

पैसे दुप्पट कसे होणार ? : या किसान विकास पत्र योजना अंतर्गत गुंतवणुक दार फक्त 1,000/- रुपयांपासून गुंतवणुक करु शकतो तर कमाल गुंतवणुकीची कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही . दिनांक 01 एप्रिल 2023 पासुन किसान विकास पत्र ( KCC ) मधील गुंतवणुकीवर वार्षिक 7.5 टक्के इतका वार्षिक व्याजदर देण्यात येतो . या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्ये म्हणजे दाम दुप्पट करणे , यामुळे वार्षिक व्याजदारांमध्ये वाढ झाल्यास मुदत आपोआप कमी होते .

म्हणजेच यापुर्वी व्याजदर हे 7.2 टक्के इतके होते यामुळे मुदत ही 120 महिन्यांची होती , तर व्याजदरांमध्ये दि.01.04.2023 पासुन 7.5 टक्के इतका झाल्याने , मुदत देखिल कमी होवून 115 महिन्यांची झाली . यामुळे गुंतवणुक करण्यात आलेली रक्कम ही 115 महिन्यांत दुप्पट होणार आहेत .

लाभ कसा घ्याल : या योजना अंतर्गत आपण जर गुंतवणुक करु इच्छित असाल तर , आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफीसला भेट देवून प्रथम किसान विकास पत्र योजना विषयक सविस्तर माहिती घेवून , आधार कार्ड , किसान विकास पत्राचा अर्ज , वय प्रमाणपत्र , पासपोर्ट आकाराचे छायाचित्र , मोबाईल नंबर अशा आवश्यक कागतपत्रांसह किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेवू शकतात .

Leave a Comment