Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Shasan Nirnay GR ] : कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ठेव संलग्न विमा योजना अंतर्गत अनुज्ञेय असणारी रक्कम अदा करणेबाबत , राज्य शासनांच्या जलसंपदा विभागांकडून दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

कर्मचाऱ्यांच्या ठेव संलग्न विमा योजना अंतर्गत अवलंबिण्यात आलेले सुधारित कार्यपद्धत निर्णयातील संदभाधीन परिपत्रकानुसार निश्चित करण्यात आलेले आहेत . सदर सुधारित कार्यपद्धतीच्या अनुषंगाने प्रस्तावांची पडताळणी करण्यात आलेले आहेत . सन 2023-24 या वित्तीय वर्षाकरीता मागणी क्रमांक आय-2 प्रधानशीर्ष 2235- सामाजिक सुरक्षा व कल्याण , 60 – इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम ,

104 – ठेव संलग्न विमा योजना शासकीय भविष्य निर्वाह निधी ठेव संलग्न विमा योजना नुसार प्रदाने या लेखाशीर्षाखालील मंजूर अनुदानाच्या तरतुदीतुन निर्णयांमध्ये जोडण्यात आलेल्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना 11,27,741/- रुपये इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहेत . सदर ज्ञापनानुसार उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी हा कोणत्याही परिस्थितीमध्ये दिनांक 29 मार्च 2024 पुर्वी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदरचा निधी हा विहीत मुदत मध्ये निधी खर्चकरण्याची जबाबदारी ही संबंधित नियंत्रक अधिकारी यांची असणार आहे . तसेच निधी विहीत मुदतीमध्ये खर्च न झाल्यास सदरचा निधी समर्पित करुन त्याबाबतचा योग्य तो खुलासा सादर करण्याची जबाबदारी ही नियंत्रक अधिकारी यांची असणार आहे .

या निधी उपलब्धता प्रमाणपत्रानुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदर वरील नमुद रक्कम अदा करण्या करीता  मंजूरीचे आदेश त्वरीत काढण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदरच्या आदेशाची प्रत ही शासनास व महालेखापालांच्या कार्यालयास पाठवण्याचे निर्देश आहेत . तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी वितरीत केलेला निधी हा तात्काळ आहरित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *