Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Cabinet Nirnay Dated 14.02.2024 ] : दि.14 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मा.मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील नागरिक , विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांच्या करीता विविध मोठे निर्णय घेण्यात आले आहेत , सदर मंत्रीमंडळ बैठकीचे अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे हे होते . यांमध्ये घेण्यात आलेले विविध निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..  

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना : सदर योजना अंतर्गत टप्पा – 2 मध्ये तब्बल 10 हजार कि.मी लांबीचे रस्त्यांचे उद्ष्टि ठेवण्यात आलेले आहेत , यापैकी सात हजार कि.मी लांबीचे रस्ते बांधण्याचा आराखडा कोणत्या जिल्ह्यांमध्ये बांधायचे आहेत ते ठरविण्यात आलेले आहेत तर 3 हजार कि.मी लांबीच्या रस्त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता देण्यात आलेली आहे .

विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विद्यावेतनांमध्ये भरीव वाढ : वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्यांना इंटर्नशिप करीता आता यापुढे दरमहा 18,000/- रुपये एवढे विद्यावेतन देण्यात येणार आहेत . यांमध्ये राज्यातील शासकीय आणि अनुदानित वैद्यकीय दंत , आयुर्वेद युनानी त्याचबरोबर होमिओपॅथी महाविद्यालयातील आंतरवासिता प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनांमध्ये वाढ केली जाणार आहे .

वाळू , रेती करीता सुधारित रेती धोरण : वाळू व रेती पुरविण्याकरीता राज्यात सर्वंकष सुधारित रेती धोरण अंमलात आले आहेत , यांमध्ये ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित केले जाणार आहेत . यामध्ये मुंबई महानगर प्रदेशासाठी 1200/- रुपये प्रति ब्रास स्वामित्वधनाची रक्कम असेल तर राज्यातील इतर क्षेराकरीता 600/- रुपये इतकी स्वामित्वधनाची रक्कम असणार आहे .

इतर महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय :

  • राज्यांमध्ये जळगांव , बारामती , सांगली , लातुर , गोंदिया , नंदुरबार या 06 ठिकाणी संलग्न 100 विद्यार्थी क्षमतेचे नर्सिंग महाविद्यालय सुरु करण्यात मान्यता देण्यात आली .
  • राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार , सुधारित आश्वासित प्रगती योजना लागु करण्यात आले .
  • राज्यात उच्च तंत्रज्ञान वापर करणाऱ्या मोठ्या उद्योगांना प्रथम प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय , यांमध्ये राज्यातील कमी विकसित भागांना फायदा होणार आहे .
  • तर मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना करीता सुधारित मार्गदर्शक सुचना देण्यात आलेले आहेत .
  • सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या तब्बल 25 इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
  • ए.औद्यागिक क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा यांना प्रोत्साहन , मुद्रांक शुल्क माफीमध्ये लीजचा समावेश करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे .
  • भुदगड तालुका मौजे पाल येथे युवा ग्रामीण विकास संस्था गारगोटी या संस्थास कायम स्वरुपी विना अनुदानित नविन समाज कार्य महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रीमडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *