Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ One Country One Khat Scheme ] : पंतप्रधान भारतीय सार्वजनिक खत प्रकल्प अंतर्गत देशांमध्ये एक देश एक खत ह्या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे , या योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना खत अनुदानातुन कमी किंमतीमध्ये दर्जेदार खत मिळणार आहेत .

सदर योजनांतर्गत खतांवर अनुदान देण्यात येणार आहेत , शिवाय हे खत प्रकल्प योजना अंतर्गत आता देशांमध्ये विकण्यात येणार युरिया भारत या नावाच्या एकाच ब्रँडचा आणि समान दर्जाचा असणार आहे . यामुळे देशातील शेतकऱ्यांचा खतांवरील होणारा खर्च कमी होणार आहे , तसेच खतांची होणारी तुटवडा देखिल भासणान नाही . तसेच कंपन्यांकरीता भारत या एकाच ब्रँडखाली खतांची विक्री करण्यास सहाय्यक होणार आहे .

सदरच्या योजना अंतर्गत युरिया , डीएपी , एमओपी , त्याचबरोबर एनपीके इ. करीता एकच ब्रँड नाव यांमध्ये भारत डीएपी , भारती एमओपी , भारत युरिया , भारत एनपीके इ. अशा प्रकारचे ब्रँड नावे असणार आहेत . ज्यामुळे देशातील सर्व खत कंपन्या , राज्य व्यापार संस्था तसेच खत विपणन संस्था खतांच्या बँगवर खत अनुदान योजना , भारतीय सार्वजनिक खत प्रकल्प दर्शविणारे एकसमान लोगो वापरणे यानंतर बंधनकारक असणार आहेत , जेणेकरुन शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा तसेच वाजवी किंमत पासुन संरक्षण मिळणार आहेत .

या योजना अंतर्गत खत निर्मित कंपन्यांना खताच्या बॅग / पोत्यांवर  केवळ 1/3 भागावरच त्यांचे नाव ब्रँड तसेच लोगो व इतर संबंधित उत्पादनांची माहिती नमुद करण्याची परवानगी असेल . तर 2/3 भागांवर भारत ब्रँड आणि पंतप्रधान भारतीय सार्वजनिक खत प्रकल्प योजनांचा लोगो छापावा लागणार आहेत .

यामुळे कोणत्याही कंपनीला आपल्या ब्रँडच्या नावाखाली अधिक भाव लावता येणार नाहीत , ज्यामुळे खतांची साठवणूकी / कमतरता यांपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *