शेतकऱ्यांसाठी गुड न्युज : रब्बी पिकांच्या हमीभावांमध्ये वाढ , पाहा पिकानुसार प्रति क्विंटल हमीभाव !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Rabbi Hamibhav Increase ] : शेतकऱ्यांसाठी सरकारने निवडणुकापुर्वी रब्बी पिकांच्या हमीभावांमध्ये वाढ करुन दिलासा दिलेला आहे .  रब्बी पिकांचे सध्या काढणी सुरु असून , रब्बी पिकांच्या हमीभाव कमी असल्याने शेतकऱ्यांना सरकारकडून गोड न्युज देण्यात आलेली आहे .

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार संदर्भात मंत्रीमंडळ समितीने विपणन हंगाम सन 2024-25 करीता सर्व अनिवार्य असणाऱ्या रब्बी पिकांचे किमान ( Minimum ) आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आल्याने , रब्बी पिकांच्या किमान आधाभुत किंमतीमध्ये वाढ झालेली आहे . पिकांनुसार वाढ करण्यात आलेली आधारभुत किंमत पुढीलप्रमाणे आहे .

यांमध्ये मसूल डाळीचा हमीभाव 425/- रुती क्विंटलने वाढविण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे , त्याचबरोबर पांढरी मोहरी आणि काळ्या माहेरीच्या हमीभावांमध्ये प्रति क्विंटर 200/- ( दोनशे ) रुपये इतक्या रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे . तर गहू मध्ये प्रति क्विंटल 150/- रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे . तसेच हरभऱ्याच्या हमीभावांमध्ये 105/- रुपयांची वाढ लागु करण्यात आलेली आहे .

गहुच्या हमी भावांमध्ये 150/- प्रति क्विंटल तर बार्ली मध्ये 115/- प्रति क्विंटल वाढ लागु करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे , म्हणजेच शेतकऱ्यांच्या वरील रब्बी पिकांना खालील प्रमाणे नमुद करण्यात आलेल्या हमीभावानुसार किमान भाव मिळणार आहे ..

अ.क्रपिकाचे नावहमीभाव (रुपये / प्रतिक्विंटल )
01.गहू2275/-
02.जव1850/-
03.हरभरा5445/-
04.मसूर6425/-
05.मोहरी5650/-
06.करडई5800/-

Leave a Comment