live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state Employee GR ABOUT OLD PENSION ] : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीस अंतिमतः दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या मुदत वाढीस कार्योत्तर मंजुरी देणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे
सदरच्या शासन निर्णयान्वये वित्त विभाग शासन निर्णय (GR) दिनांक 14 मार्च 2023 नुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS ) व जुनी निवृत्तीवेतन योजना (OLD PENSION ) यांचा तुलनात्मक अभ्यास करून दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर खात्रीशीर आर्थिक त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता उपाय योजना बाबत शिफारस अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवा अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे .
सदर समितीने तीन ( 03 ) महिन्यात शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या , त्याचबरोबर समितीकडे प्राप्त झालेल्या माहितीचे आर्थिक , वैज्ञानिक , सांख्यिकीय त्याचबरोबर तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करून शासनास परिपूर्ण शिफारस / अहवाल सादर करण्याकरिता समितीस वित्त विभाग शासन निर्णय (GR ) दिनांक 27 जुलै 2023 नुसार दोन (02) महिन्याकरिता दिनांक 13 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती .
सदर समितीने आपले कामकाज दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करून आपला अहवाल शासनास सादर केला आहे , याकरिता सदर समितीने दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत केलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर समितीस अंतिमतः दिनांक 30 नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या मुदत वाढीस कार्योत्तर मंजुरी सदर शासन निर्णयानुसार देण्यात येत आहे .
या संदर्भातील वित्त विभाग कडून दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहू शकता ..