Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Vote For Old Pension Scheme ] : राज्यातील कर्मचाऱ्यांनी लोकसभा निवडणुका पुर्वी मताची ताकद दर्शविण्यासाठी नागपुर ते मुंबई अशा संकल्प यात्रेस दिनांक 19 फेब्रूवारी 2024 पासुन सुरुवात करण्यात येणार आहे . यांमध्ये जागोजागी Vote For OPS साठी जनता / कर्मचाऱ्यांचा पाठिंबा / मत घेण्यात येणार आहेत .
या संकल्प यात्रेस दि.19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरी झाल्यानंतर नागपुर येथून सकाळी 9.00 वाजता सुरुवात होणार आहे . तर दुपारी 1.00 वाजता तळेगाव ( वर्धा ) येथे पोहोचेल . त्यानंतर दि.20 फेब्रुवारीला सकाळी 11.00 वाजता कारंजा लाड ( वाशिम ) येथे पोहोचेल . त्यानंतर दुपारी यवतमाळ ला पोहोचेल .
त्यानंतर नांदेड -लातुर-परभणी -हिंगोली -शिंदखेड राजा – छत्रपती संभाजी नगर – अहमदनगर -शिर्डी -पुणे -नाशिक – पालघर / डहाणु – ठाणे / शहाणु – आझाद मैदान असा प्रवास दिनांक 19 फेब्रुवारी 2024 ते दिनांक 28.02.2024 दरम्यान करण्यात येणार आहेत . सदरच्या संकल्प यात्रेचे नियोजन हे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहेत .
येत्या पुढील आठवड्यांमध्ये राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार असल्याने , तसेच माहे एप्रिल महिन्यांत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार असल्याने , कर्मचाऱ्यांच्या मताची ताकत दर्शविण्यासाठी सदरच्या संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहेत . ही संकल्प यात्रा तब्बल 17 जिल्ह्यातुन निघणार असल्याने , राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांकडून या यात्रेस भेट देवून Vote For OPS मोहिम राबविण्यात येणार आहेत .
या संकल्प यात्रेचे नियोजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.