Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee IMP Shasan Paripatrak ] : राज्यातील शासकीय / निमशसकीय व अनुदानित संस्थामधील अधिकारी व कर्मचारी यांची माहिती उपलब्ध करुन मिळणेबाबत . राज्य शसनांच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागांकडून दिनांक 07 फेब्रुवारी 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
ग्राम विकास विभाग कार्यासनाचे दिनांक 05.02.2023 रोजीच्या पत्रानुसार , राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी ( जिल्हा परिषदा सर्व ) यांना मागविण्यात आलेली माहिती अद्यापही अप्राप्त आहे . आता महाराष्ट्र राज्य मागास प्रवर्ग आयोगाचे दिनांक 06.02.2024 रोजीच्या पत्राचे अवलोकन व्हावेत असे सूचित करण्यात आलेले आहेत .
सदर पत्रानुसार मराठा जातीच्या पदांच्या संख्येत EWS व SEBC प्रवर्गातून नियुक्त झालेल्या मराठा जातीच्या कर्मचाऱ्यांची संख्या समाविष्ट नसल्यास , ती समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यामुळे मराठा जातीच्या पदांच्या संख्येत बदल होत असल्यास , सुधारीत माहिती तात्काळ पाठविण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना पुन्हा सुचना देण्यात आलेल्या आहेत .
यांमध्ये राज्यातील शासकीय , निमशासकीय व अनुदानित संस्था कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती देणेबाबतचे विवरणपत्र खाली नमुद परिपत्रकांमध्ये नमुद आहेत .तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग मार्फत देखिल कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध करुन देणेबाबत पत्र विभागीय कार्यालयांना सादर केले आहेत .
या संदर्भात निर्गमित सविस्तर शासन परिपत्रक व विवरण पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.