Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ One Day Pension Parishad ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे पेन्शन मागणीकरीता एक दिवसीय पेन्शन परिषद शुक्रवारी दिनांक 09 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शाहीर अणाभाऊ साठे नाट्येगृह जिजामाता उद्यानाशेजारी , भायखळा पुर्व या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत .
महाराष्ट्राची राजधानी व भारताची देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि 7 बेटांवर वसलेल्या मुंबई शहरांचा कारभार चालविणाऱ्या बृहन्मुंबई महानगर पालिकेचे कामगार , कर्मचारी ,अधिकारी मार्फत सदर पेन्शन परिषद आयोजित करण्यात आलेली आहे . तसेच राज्यतील 28 महानगरपालिकांपैकी सन 1988 मध्ये निर्माण झालेल्या एक कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येबाबत अ + दर्जा प्राप्त असणारी व नावापुढे बृहन हा शब्द धारण करणारी बृहन्मंबई महानगर पालिका ही राज्यातील एकमेव पालिका आहे .
देशातील 10 महापालिकांएवढा अथवा काही लहान राज्याएवढा अर्थसंकल्प बृहन्मुंबई महानगर पालिकेचा असतो , सन 2023-24 मध्ये पालिकेचा अर्थसंकल्प 52,256.07 कोटींचा सादर केला गेला , ज्यांमध्ये महसुली उत्पन्न 33,290.03 कोटी तर भांडवली प्राप्ती 20,966.04 कोटी रुपये इतका आहे . सन 1992 च्या लोकसंख्येच्या आधारे 1,44,000 कर्मचाऱ्यांची आस्थापना सूची असणाऱ्या बृहन्मुंबई पालिकेत सध्या 2024 मध्ये 91,375 कर्मचारी कार्यरत आहेत याच नियुक्त कर्मचाऱ्यांमध्ये 50,570 कर्मचारी हे DC 1 धारक असून आजपर्यंत 3066 DC 1 कर्मचारी सेवानिवृत्तही झाले आहेत .
केंद्र सरकारने कलम 309 मधील सेवा शर्थी अटी व मंत्री मंडळाचे अधिकार वापरुन दिनांक 31.12.2003 मध्ये जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला , त्यानंतर दिनांक 01.04.2004 ला नविन पेन्शन योजना ( NPS ) अंमलात आणली . राज्यांना ही NPS सक्तीची नसतानाही देशातील राज्यांमध्येही दिनांक 31.10.2005 ला जुनी पेन्शन योजना बंद करुन नविन पेन्शन योजना लागू केली आहे .
याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यानंतर 02 वर्षे 6 महिने व 4 दिवसानंतर बृहन्मुंबई महानगर पालिकेत दिनांक 05 मे 2008 व तदनंतर सेवेत नियुक्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु करण्यात आली . NPS धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ सरसकट लागु करणेबाबत , सदर एक दिवसीय पेन्शन परिषदेस मुंबई शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील , अंधेरी पुर्व विधानसभेचे आमदार ऋतुजाताई लटके , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेशजी खांडेकर तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्य प्रमुख ( आरोग्य विभाग ) श्री.संजयजी सोनार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.