Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : माणिकराव हे नाशिक मधील रहिवाशी असून , त्यांनी आपल्या 3 एकमध्ये चक्क 36 लाख रुपये पर्यंत कमाईचा स्त्रोत आकडा गाठला आहे . नेमकी शेतीमध्ये कोणत्या पिकाचे उत्पन्न केली जाते , किती खर्च येतो , कमाई कशी होते , या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
माणिकराव पिंपळे यांनी पारंपारिक पिके घेवून कमी उत्पनामुळे काहीतरी नविन करण्याचा विचार केला आणि आपल्या शेतांमध्ये 03 एकर भरुन स्ट्रोबेरीची शेतील करण्याचा निश्चिय केला , व उत्पनांमध्ये चक्क 36 लाख रुपये पर्यंतचा आकडा गाठला आहे . स्ट्रॉबेरीला बाजारांमध्ये मोठी मागणी असल्याने , स्ट्रॉबेरीची किंमत देखिल जास्त आहे . यामुळे स्ट्राबेरी पिकाची लागवड केल्याने माणिकराव पिंपळे यांना शेतीमधून मोठा फायदा होत आहे .
एका एकरसाठी किती खर्च येतो : एका एकर मध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करण्यासाठी आपणास रोपे , सिंचन , पॉलिथिन याकरीता लगभग 1.50 लाख ते 2 लाख रुपये पर्यंतचा खर्च येवून जातो कारण एका रोपाची किंमत ही 30-40 रुपये पर्यंत आहे . यामुळे एका एकरला 2 लाख तर तीन एकरला माणिकरावा यांना 6 लाख रुपये एवढा खर्च आला .
कमाई किती होते : एका झाडाला 1 कि.लो ग्रॅम पर्यंत स्ट्रॉबेरी लागते , याचे विशेष म्हणजे लागवड केल्यापासून 40 ते 50 दिवसांपासून फळ देण्यास सुरुवात होते . एका झाडाला 600 ग्रॅम ते 700 ग्रॅम पर्यंत स्टॉबेरी फळ येते , एका एकर मध्ये 22,000 ऐवढे स्ट्रॉबेरीचे झाले लावले जावू शकतात . याचा विचार केला असता 22,000 झाडाला चांगली देखभाल केल्यास तब्बल 7 टन ते 10 टन पर्यंत उत्पन्न होवू शकेल .
एक किलो स्ट्रॉबेरीची किंमत ही 300-600 रुपये ऐवढी आहे . आपण सर्वसाधारण किंमतीचा विचार केला असता , आपणास किमान 36 लाख रुपये पर्यंत कमाई होईल , यामधून 6 लाख रुपये खर्च वजा केला असता , तब्बल 30 लाख रुपयांचा निव्वळ नफा होते . अशा पद्धतीने माणिकरावांनी स्टॉबेरी शेतीमधून कमी कालावधीत चांगले उत्पन्न कमवत आहेत .