Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Age Increase Cabinet Nirnay ] : राज्यातील काही खाली नमुद कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करणेबाबत , राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे सदर कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ प्राप्त होणार आहे .

दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनांच्या मंत्रीमंडळ बैठक राज्याचे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . सदर बैठकीमध्ये राज्यातील कृषी विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी संघटनांनी सेवानिवृत्तीचे वय वाढविणेबाबत , सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता , सदर प्रस्तावावर सविस्तर चर्चा करुन राज्यातील कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असणारे शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे .

नेमके कोणत्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वय वाढविण्यात आले : राज्य शासन सेवेतील कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन वाढवून 60 वर्षे करण्याचा मोठा निर्णय राज्य मंत्रीमंडळ बैठक घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे राज्यातील कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे . या निर्णयामुळे सदर शिक्षकांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे .

राज्यातील इतर गट अ , ब व क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याची बऱ्याच दिवसांची मागणी रेटली जात आहे , आता वरील निर्णयामुळे राज्यातील इतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ करण्याची आशा पल्लवित होत आहेत .

सध्य स्थितीमध्ये राज्यातील गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे आहेत , तर गट अ , ब व क संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षे आहेत . दुसऱ्या बाजुला केंद्र सरकारी त्याचबरोबर देशांमध्ये तब्बल 25 राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे आहेत , याच धर्तीवर राज्यातील कर्मचारी देखिल सेवानिृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी करीत आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *