Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Sovereing Gold Bond Scheme 2024 ] : सोनं खरेदीदारांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकने एक नविन योजना आणली आहे , त्यामधून आपण बॉन्डच्या स्वरुपात सोन्यांमध्ये गुंतवणुक करु शकता . शिवाय यावर आपणांस वाढत्या किंमतीबरोबच व्याज देखिल मिळणार आहेत . या बद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
आपण जर वाढत्या सोने खरेदी करण्यासाठी सोन्याचे भाव कमी कधी होतील , याची वाट पाहत असाल तर , पुढील महिन्यांमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सॉव्हरिन गोल्ड बाँड विक्रीस सुरुवात होणार आहे . यांमध्ये आपणांस स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी प्राप्त होईल . या योजनेचा चौथा हप्ता हा फेब्रुवारी मध्ये जारी करण्यात येणार आहे , त्यामुळे आपणांस गोल्ड बाँड मध्ये गुंतवणुक करु शकता . चौथा हप्ता कालावधी हा दिनांक 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 असा असणार आहे .
सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड नेमकं काय आहे ? : सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड मध्ये गुंवणूक केली म्हणजे आपण सोनंचे खरेदी केली , परंतु यांमध्ये आपण फक्त डाक्युमेंटरी सोनं खरेदी करतो . ही योजना भारतीय रिझर्व्ह बँकेची आहे , RBI कडे असणाऱ्या सोन्यांचे बॉन्ड मध्ये विक्री केली जाते . हा बॉन्ड आपण सोन्याची जी किंमत असेल त्या किंमतीमध्ये विक्री करु शकतो .
यांमध्ये आपणांस सोन्याच्या वाढत्या किंमतीसह वार्षिक व्याज देखिल प्राप्त होईल . यांमध्ये आपणांस सोन्याच्या प्रति ग्रॅम भावापेक्षा 50/- रुपये सुट देण्यात येते . ह्या योजनांमध्ये आपण 08 वर्षांकरीता गुंतवणुक करु शकतो . ही योजना प्रथम केंद्र सरकारडून सन 2015 मध्ये सुरुवात केली होती . या बाँन्डवर आपणास प्रतिवर्षी 2.50 टक्के व्याजरद देखिल प्राप्त होतो .
सॉव्हरिन गोल्ड बाँन्ड कशी गुंतवणुक कराल : पुढील महिन्यातील चौथ्या मालिकेतील सॉव्हरिन गोल्ड बाँन्ड खरेदी करण्यासाठी आपण स्टॉक एक्सचेंज ( NSE , BSE ) , तसेच पोस्ट ऑफीस आणि व्यावसायिक बँकाच्या माध्यमातुन खरेदी करु शकता .