Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee sudharit Ansharashikaran Shasan Nirnay ] : 7 व्या वेतन आयोगानुसार , दिनांक 01 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालवधीत सेवानिवृत्त निवृत्तीवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देणेबाबत , सुधारणा करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
दिनांक 01 जानेवारी 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या ज्या निवृत्तीवेतनधारकांनी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण नियम 1984 नुसार सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित होणाऱ्या निवृत्तीवेतनाप्रमाणे अशंराशीकरणाचा लाभ घेताला आहे , तसेच दिनपांक 05.02.2021 रोजीच्या शासन निर्णय निर्गमित होण्यापुर्वी ज्यांचा मृत्यु झालेला आहे , अशा निवृत्तीवेतनाधारकांच्या कुटुंबियांना सुधारित निवृत्तीवेतनावर अंशराशीकरणाचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे .
यानुसार विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी सदर दिनांक 01.01.2016 ते दिनांक 31.12.2018 या कालावधीत मृत पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून प्रकरणाची योग्य ती पडताळणी / छाननी करुन सदर कार्यवाही शासन पुरकपत्राच्या दिनांकापासून सहा महिन्यामध्ये पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक यांना वरील पुरकपत्रक योग्य त्या फेरफारांसह लागू असणार आहेत .
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 248 नुसार प्रदान केलेले अधिकारी आणि त्या संबंधीची इतर सर्व अधिकार यांचा वापर करुन शासन असाही आदेश देत आहे कि वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू असतील , असा निर्णय देण्यात आलेला आहे .
या संदर्भातील वित्त विभागांकडून दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.