Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Patanjali SIM Card News ] : सध्या सोशल मिडीयावर पतंजली सीम कार्ड बाबत मोठ्या प्रमाणात बातम्या प्रसारित होत आहेत . पतंजली कंपनी व भारतीय दुरसंचार निगम लिमिटेड सोबत नविन 5 जी सीम कार्ड लाँच केल्याची माहिती समोर येत आहेत . यांमध्ये आपल्याला कमी किंमतीमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार आहे .
मिळालेल्या माहितीनुसार , या कार्डचे नाव हे स्वदेशी समृद्धी कार्ड असे ठेवण्यात आलेले आहेत . भारतांमध्ये जियो कंपनीचे सर्वात जास्त ग्राहक आहेत , त्यापाठोपाठ आइडिया व एअरटेल कंपनीचा नंबर लागतो . देशांमध्ये जियो कंपनीचे रिचार्ज प्लॅन इतर कंपनींपेक्षा स्वस्त आहेत , तर इतर कंपनीपेक्षा नेटवर्क कनेक्टीव्हिटी अधिक वेगवान आहे .
यामध्ये आता पतंजली कंपनी मार्फत स्वदेशी समृद्धी सिम कार्ड लाँच करण्यात आले आहेत . यांमध्ये रामदेव बाबांनी सांगितले आहे कि , भारतीय दुरसंचार निगम लिमिटेड या कंपनीसोबत पतंजली स्वदेशी कार्डचा देशांमध्ये अधिकाधिक ग्राहक वाढतील व स्वस्त रिचार्ज प्लॅन करण्यात येतील . सिम कार्डसोबतच ग्राहकांना आरोग्याच्या व आयुर्विमासारखे लाभ मिळतील .
रिचार्ज प्लॅन कसे असतील : सध्या जियो कंपनीचे रिचार्ज प्लॅन इतर कंपनीपेक्षा स्वस्त आहेत , यापेक्षाही बीएसएनल कंपनीचे रिचार्ज प्लॅन अधिक स्वस्त आहेत , परंतू या सरकारी कंपनीचे नेटवर्क सेवा हवे तेवढी नाही . शिवाय ही कंपनी मोठ्या प्रमाणात तोट्यात चालत असल्याने , या कंपनीचे केंद्र सककारकडून खासगीकरण करण्याचे संकेत आहेत . याच कंपनीसोबत पतंजली समभाग घेवून नेटवर्क सेवा मध्ये काम करणार आहे . यांमध्ये आपल्याला 144 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सेवा व दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 SMS पैकची सुविधा मिळणार आहे . जे कि जियो कंपनीपेक्षा अधिक स्वस्त असणार आहे .
हा सिम कार्ड प्रथम पतंजली कंपनीसोबत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळेल , त्यानंतर हे सिम कार्ड सर्वांसाठी उपलब्ध होईल . सध्य स्थितीमध्ये या कार्डचे चाचपणी सुरु असल्याचे वृत्त समोर येत आहेत .