Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Farming is a Best opportunity For Futures ] : जागतिक स्तरावर शेती क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी होत आहेत . यामुळे भविष्यात शेती क्षेत्रांमध्ये मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे संकेत नितीन गडकरी यांनी आपल्या एका भाषणात सांगितले आहे . नितिन गडकरी हे नेहमीच कृतीशील भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत .

त्यांच्या भाषणांत नेहमीचे शेती विषयक बाबीमध्ये काय नविन करता येतील , याकडे लक्ष वेधून घेतात .त्यांनी केलेल्या उपाययोजना नुसार बांबु हे ग्रास असून बांबूची जंगलातून कटाई करण्यास परवानी दिली ,कारण ग्रास हे परत 3 महिन्यांनंतर वाढ होते . शिवाय शेतकऱ्यांना बांबु लागवडीसाठी प्रोत्साहन दिले .

कारण भारतांमध्ये सर्वात जास्त बांबुचे प्रमाण असूनही भारत देशात बांबुची आयात करण्यात येत होती , यांमधून भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी बांबूची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आलेले आहेत . तसेच पडीत जमीनीमध्ये बाबुंची लागवड प्रशासकीय स्तरावर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यापासून अनेक फर्निचरचे साहित्य बनविण्यासाठी वापर करण्यात येतो .

तसेच ग्रामीण भागांमध्ये वीजेची उपलब्धता कमी असते , यामुळे ग्रामीण भागांमध्ये आता शेतकऱ्यांना सोलार शेतील हा नविन उपक्रम करु शकता . व तयार झालेली विज वीज कंपन्यांस विक्री करु शकता . त्याचबरोबर मत्स्य शेती ही मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सरकारच्या अनुदानाचा वापर करुन मत्स्य शेती मोठ्या व्यवसायांमध्ये करण्याची संधी आहे .

इथेनॉल ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान : भविष्यांमध्ये पेट्रोल , डिझेल यांचे प्रमाण कमीच होणार आहेत , यामुळे जागतिक पातळीवर नविन उर्जा स्त्रोताच्या शोधात आहेत . यांमध्ये इथेनॉल हा एक उत्तम पर्याय असणार आहे . पेट्रोलसाठी इथेनॉल पर्यायी इंधन म्हणून वापरला जातो , परंतु सध्या यांमध्ये मॉडिफिकेशन होणे आवश्यक आहे . पण भविष्यात इथेनॉलचे प्रमाण अधिक वाढणार आहेत .

इथेनॉलची निर्मिती ही उस , मका अशांपासून होते . यामुळे शेतकऱ्यांना भविष्य चांगले येणार आहेत . कारण पेट्रोल , डिझेलचे साठे सध्या संपुष्टात येणाच्या घाईत आहेत . यांमध्येचे अनेक गाड्या इथेनॉल चालत आहेत . सध्या भारतामध्ये टायोटो कंपनीने संपुर्ण 100 टक्के इथेनॉल वर चालणार कार तयार केली आहे . यामुळे भविष्यात याचे प्रमाणे अधिक झाल्यास , शेतकऱ्यांचे अच्छे दिन नक्कीचे येतील .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *