Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Mahagai Bhatta Vadh News ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता वाढ निश्चित करण्यात आलेली आहे . यांमध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासून 5 टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ प्राप्त होणार आहे .

केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माहे नोव्हेंबर 2023 पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत , तर माहे डिसेंबर 2023 या महिन्याचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक 31 जानेवारी 2024 पर्यंत जाहीर केले जाईल .फक्त माहे डिसेंबर 2023 ची आकडेवारी प्रसिद्ध बाकी असल्याने डी.ए वाढीचा निर्णय अद्याप बाकी आहे .

माहे नोव्हेंबर 2023 पर्यंत AICPI निर्देशांक हा 139.1 असा आहे , माहे जुलै ते नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या निर्देशांकाचा विचार केला असता , सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 4.90 टक्के पर्यंत वाढ होणे अपेक्षित आहे . यांमध्ये माहे डिसेंबर 2023 च्या निर्देशांचा विचार केला असता डी.ए मध्ये 5 टक्के वाढ होणे निश्चित आहे .

डी.ए वाढीचा निर्णय कधी : दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणुकीची तारीख निश्चित झाली आहे , तसेच 01 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र सरकारचे शेवटचे अर्थसंकल्प आहे , यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये वाढ करणेबाबत अधिकृत्त निर्णय निर्गमित होवू शकतो ..

सदर पाच टक्क्यांची वाढ झाल्यास , सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकुण महागाई भत्ता हा 51 टक्के म्हणजेच 50 टक्केची मर्यादा ओलांडणार असल्याने , इतर देय भत्ते ( घरभाडे / वाहन भत्ता ) मध्ये देखिल वाढ होईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *