Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Sevaniyam ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत व्यापर / इतर नोकरी तसेच शेअर मार्केट मधील पैसांची गुंतवणुक या संदर्भातील सविस्तर सेवानियम पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

कोणताही सरकारी कर्मचारी हा सरकारची पुर्वमंजुरी शिवाय कोणत्याही प्रकारची इतर नोकरी ( अर्धवेळ / पुर्णवेळ ) स्वकारु शकत नाही . त्याचबरोबर इतर कोणत्याही उद्योग समुहात सहभाग / स्वत : उद्योग करणार नाही . परंतु पुर्णत : धर्मादाय , साहित्यीक तसेच सामाजिक त्याचबरोबर कलात्मक किंवा वैज्ञानिक स्वरुपाचे काम मानसेवा तत्वावर काम करु शकतो . हे कार्य करीत असताना त्याच्या नियमित कार्यालयीन कामकाजावर कोणत्याही प्रकारचे परीणाम होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असेल .

त्याचबरोबर शासकीय कर्मचारी हा त्याच्या पत्नीच्या मालकीच्या अथवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या मालकीच्या असणाऱ्या कमिशन एजन्सी / विमा एजन्सी या संदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रचार करु शकत नाही . जर या प्रकारची एखादी एजन्सी असल्यास त्यांने शासनांस कळविणे आवश्यक असेल . जर कर्मचाऱ्यांस व्यापारी स्वरुपाची एखादी नोकरी स्वीकारायची असल्यास त्याने शासनाची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल .

शेअर बाजारातील गुंतवणुक : शेअर बाजारांमध्ये किंवा सदर प्रकारची गुंतवणुकीमध्ये शासकीय कर्मचारी हा सेवानियम 17 नुसार पैसांची गुंतवणुक करु शकत नाही . कारण शेअर , कर्ज रोखे / इतर गुंतवणुकी यांची वारंवार खरेदी / विक्री करणे आ एक प्रकारचा सट्टा समजला जातो .

ड्रीम 11 सारखे सट्टेबाजी खेळांमध्ये पैसे लावणे : सध्या ऑनलाईन स्वरुपात पैसे लावून खेळण्यासारखे अनेक गेम उपलब्ध आहेत . यांमध्ये ड्रीम 11 हे सर्वात जास्त लोकप्रिय आहे , तसेच लूडो / चेस / तीन पत्ती ( रम्मी ) अशा प्रकारचे पैसे लावून खेळण्यासाठी गेम आहेत . यामध्ये आपल्याला पैसे लावावे लागतात , यामूळे हे खेळ एक प्रकारचे सट्टेबाजी म्हणून गणले जातात . यामुळे या प्रकारचे खेळ शासकीय कर्मचाऱ्यांनी खेळू नयेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *