Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Watsalya Scheme ] : गर्भवती , बालकांच्या आरोग्यासाठी सरकारकडून नविन वात्सल्य योजना सुरु करण्यात आलेली आहे . या योजनेच्या माध्यमातुन गर्भवती व बालकांच्या आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे . सदर नविन वात्सल्य योजना बाबतची सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

गर्भवती महिला आणि 02 वर्षापर्यंतच्या बालकांचे आरोग्याच्या सुधारणासाठी नविन वात्सल्य योजनेच्या सुरुवात करण्यात आलेली आहे . यांमध्ये दोन वर्षापर्यंतची बालके , प्रसूतीपश्चात माता तसेच गर्भवती महीला यांना आरोग्य विभागांकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांच्या सक्षमीकरण करण्याकरीता ह्या योजनांची आखणी करण्यात आलेली आहे .

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी नुकेच मेळघाट त्याचबरोबर राज्यातील विविध ठिकाणी आरोग्य बाबीच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरा केला आहे . दरम्यान त्यांच्या लक्षात आलेल्या आरोग्याच्या सेवांमध्ये अधिक सक्षमीकरण करण्यासाठी नविन वात्सल्य योजनांची सुरुवात करण्यात येत आहेत . याबाबतच्या सुचना आरोग्य विभागास देण्यात आलेल्या आहेत . यानुसार राज्यात नविन वात्सल्य योजना लागू करण्यात येत आहेत .

या नविन वात्सल्य योजनेचे मुख्य उद्दीष्ट्ये म्हणजे माता आणि बालमृत्यु कमी करणे तसेच प्रसूती दरम्यान आणि प्रसूतीनंतर माता व बाल संगोपनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत . दर नविन वात्सल्य योजना उपक्रम अंतर्गत महिला गर्भवती पासून ते मुलगा 02 वर्षांचा होईपर्यंत आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या आरोग्यांच्या सेवा प्रभावीपणे दिले जाणार आहेत .

या नविन वात्सल्‍य उपक्रमांमध्ये कोणत्या बाबींवर अधिक भर देण्यात येणार : या नविन वात्सल्य योजनांमध्ये गर्भवतींची नियमित आरोग्याची तपासणी करण्यात येईल , तसेच कुटुंबनियोजन साधन न वापरणाऱ्या जोडप्यांची तपासणी करण्यात येईल , त्याचबरोबर माता , बालकाला आरोग्यासाठी असणारी जोखीम तपासली जाईल , तसेच जोडप्यांवर उपचार आणि त्यांचे समुपदेशन करण्यात येईल .

त्याचबरोबर प्रसूतिपूर्व , प्रसूतिपश्चात धोक्यांची तपासणी करण्यात येईल , त्याचबरोबर मातांचे वजन वाढ , बालकांचे योग्य वाढ यावर नियमित देखरेख ठेवण्यात येईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *