Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Anganvadi Employee Strike News ] : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिनांक 03 डिसेंबर 2023 पासून कामबंद आंदोलनास सुरुवात केली होती . सदरचा संप अखेर सरकारच्या सकारात्मक निर्णयानंतर मिटला आहे . यांमध्ये सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन ग्रॅच्युईटी व मोबाईल देण्याचा तसेच मानधनात मोठी वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहेत .
राज्यातील सर्वच अंगणवाडी कर्मचारी दिनांक 03 डिसेंबर पासून बेमुद कामबंद आंदोलनावर गेल्याने राज्यांमध्ये लहान मुलांचे तसेच गर्भवती मुहिला यांचे हाल होत असल्याने , सदर आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष वेधले होते . हा संप चक्क 51 दिवसांपासून सुरु होता , सरकारकडून उचित निर्णय न घेतल्याने , हा संप रेटत चालला होता .
सदर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागणींचा विचार करुन अखेर अंगणवाडी सेविका / मदतनिस कर्मचाऱ्यांना पेन्शन अदा करणेकामी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे सरकारकडून मान्य करण्यात आले आहेत . सदरचा प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळच्या मंजुरीकरता पाठविण्यात येणार आहे , अशा प्रकारची ग्वाही देण्यात आलेली आहे . तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅच्युइटी देण्याचे देखिल मान्य करण्यात आलेले होते .
तसेच सर्वच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी नविन मोबाईल लवकरात लवकर दिले जाणार आहेत . त्याचबरोबर राज्यातील मिनी अंगणवाडी सेविकांना पुर्णवेळ सेविका या पदाचे आदेश दिले जाणार आहेत . त्याचबरोबर सदर संपाच्या कालावधी मध्ये ज्यांना कामावरुन कमी करण्यात आलेले होते , त्यांना परत कामावर घेण्यात येणार आहेत .
यांमध्ये कोरोना तसेच उन्हाळी सुट्यांमधील संप काळातील मानधन अदा करण्याची मागणी अंगणवाडी कृती समितीने केली आहे , याबाबत देखिल सकारात्मक विचार करण्याचे राज्य शासनाने मान्य केले आहेत . सदरच्या मागण्या मान्य केल्याने , अखेर राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.