Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Prajaksattak din Maharashtra State Chitrarath ] : येथे होणाऱ्या संचलनात प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे चित्ररथ म्हणून शिवराज्याभिषेक वर आधारित चित्ररथ साकार करण्यात येणार आहेत .या चित्ररथाचे फोटोज् राज्याच्या माहिती जनसंपर्क संचालनालय च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत .
भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराज या विषयाचा चित्ररथ साकार करण्यात येणार आहे यावर्षी 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष पार्श्वभूमीवर हा चित्ररथ साकार करण्यात आलेला आहे .

हे चित्ररथ देशातील सर्वांना प्रेरणा देणारे चित्ररथ ठरणार आहेत . यामधे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य स्थापनेपासून पर्यंतचा प्रवास दर्शविण्यात आलेला आहे .

या चित्ररथ सादर प्रसंगी भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकातील 16 कलाकार प्रदर्शन करणार आहेत .
