Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Nukasan Bharapai Pension ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना अनेक प्रकरण निहाय वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्शन दिल्या जातात , यापैकी नुकसान भरपाई निवृत्ती वेतन कोणत्य प्रकरणांमध्ये दिला जाते , सदर निवृत्ती वेतनाचे कोणते नियम आहेत , याबाबत सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांने धारण केलेले स्थायी पद जर रद्द झाले , असेल अशा प्रकरणी त्यास देण्यात आलेले पर्यायी पद जर त्यास मान्य नसल्यास किंवा त्यापदाच्या कर्तव्याच्या स्वरुपामध्ये बदल केल्याने , त्यास जर शासकीय सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले तर अशा प्रसंगी जी निवृत्ती वेतन देण्यात येते त्यास भरपाई निवृतती वेतन असे म्हटले जाते .

स्थायी पद रद्द झाले अशा प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांसमोर भरपाई निवृत्ती वेतन स्वीकरणे किंवा अन्य आस्थापना वर दुसरे पदी अगदी कमी प्रमाणातील वेतनावर पद स्वीकरणे असे दोनच पर्याय त्यांच्यापुढे असतात . सदर प्रकरणी दुसऱ्या पदांवर नियुक्ती स्वीकारली तर त्या कर्मचाऱ्याची तात्पुरती अहर्ताकारी सेवा निवृत्ती वेतनाकरीता ग्राह्य धरली जात असते .

अशा प्रकरणांमध्ये जर कर्मचाऱ्यांस तीन महिने अगोदर नोटीस न देता कार्यमुक्त केले असल्यास , तीन महिन्यांच्या अथवा जेवढे दिवस तीन महिन्यांस कमी पडतील तेवढ्या दिवसांच्या वित्तलब्धी ऐवढे जादा उपदान त्यास मंजूर करावे लागते .वित्तलब्धी म्हणजेच वेतन किंवा रजा वेतन त्याचप्रमाणे अशा उपदान प्राप्त कर्मचाऱ्यांचे भरपाई निवृत्ती वेतन पात्र जेवढ्या दिवसाचे उपदान दिले आहेत तो कालावधी संपल्याच्या नंतर सुरु होईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *