Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Lokasabha Election 2024 Update ] : देशांमध्ये लोकसभेच्या निवडणुका या वर्षी होणार आहेत , याबाबत मुख्य निवडणुक अधिकारी दिल्ली यांच्याकडून दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकानुसार , लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या संभाव्य तारीख हि 16 एप्रिल 2024 ही असणार असल्याचे दिनांक 19 जानेवारी 2024 च्या परिपत्रकांमध्ये मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांनी नमुद केलेले आहेत . यांमध्ये देशाचे मुख्य निवडणुक अधिकारी नमुद केले आहेत कि , मला भारतीय निवडणूक आयोगाने जारी करण्यात आलेल्या निवडणूक नियोजकाकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत ,
ज्यात निवडणूकीपर्यंतच्या विविध क्रिया कलापांना प्रत्येक क्रियाकलाप सुरु होण्याकरीता तसेच होण्यासाठी कालावधी / कालावधी देण्यात आलेले आहेत . सदर परित्रकांमध्ये नमुद केल्याप्रमाणे निवडणूक नियोजकामध्ये प्रारंभ व समाप्ती तारखांची गणना करण्याकरीता 16.04.2024 ही दिनांक मतदानाचा तात्पुरता दिवस म्हणून निवडणुक आयोगांकडून जाहीर करण्यात आला आहे .
याकरीता पुर्वनियोजित कामे पुर्ण करण्याकरीता निवडणुका शाखेकडून सुरुवात केली जाणार आहे . यांमध्ये निवडणुक याद्या अद्यावत करणे , मतदान मशिन दुरुस्त्या करणे , आवश्यक मनुष्यबळ निर्माण करणे , निवडणुक कामकाजासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे इ .कामकाजासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या संदर्भात मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालय , दिल्ली मार्फत निर्गमित करण्यात आलेले सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..