Live Marathipeper संगिता पवार प्रतिनिधी [ Kisan seva Yojana Petol Pump Dealership ] : ग्रामीण भागांमध्ये जास्त करुन व्यापारी लोकं पेट्रोल पंप टाकण्यास नापसंदी दर्शवितात , यामुळे किसान सेवा केंद्र योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ग्रामीण भागांमध्ये पेट्रोल पंप उघडण्यासाठी कमी बजेट मध्ये पंप डिलरशिप देण्यात येते . याबाबत सविस्तर माहिती , किती कमाई होते , किती जागा लागते या बाबतची सविस्तर पात्रता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
केएसके पेट्रोल पंप डीलरशिप घेण्यासाठीची पात्रता : यांमध्ये प्रथम अर्जदार हा भारतीय नागरिक आणि रहिवाशी असणे आवश्यक असेल . तसेच अर्जदाराचे किमान वय हे 21 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे . तसेच अर्जदार हे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत . अर्जदार ज्या जिल्ह्याकरीता आवेदन करीत असेल त्या ठिकाणचे कायम वास्तव्य केले पाहिजे .यांमध्ये खेळाडू , विधवा इत्यादींकरीता प्राधान्य दिले जावू शकते .
ठेव रक्कम / फीस : पेट्रोल पंपासाठी आवश्यक चालु भागभांडवल हे साधारण शहरी भागांकरीता 25 लाख तर ग्रामीण भागांकरीता 12 लाख रुपये आवश्यक आहे . तर फीसच्या बाबतीत शहरी भागांकरीता 15 लाख रुपये तर ग्रामीण भागांकरीता 500,000/- लाख रुपये अशी आहे . तर सुरक्षा ठेव रक्कम ही संवर्गनिहाय वेगवेळी आहे .
संवर्ग | प्रकार | सुरक्षा ठेव रक्कम |
खुला प्रवर्ग | शहरी भाग | 5 लाख रुपये |
खुला प्रवर्ग | ग्रामीण भाग | 4 लाख रुपये |
इतर मागास प्रवर्ग | शहरी भाग | 4 लाख रुपये |
इतर मागास प्रवर्ग | ग्रामीण भाग | 3 लाख रुपये |
SC / ST | शहरी भाग | 3 लाख रुपये |
SC / ST | ग्रामीण भाग | 2 लाख रुपये |
मिळणारे उत्तन्न : यांमध्ये आपल्याला पेट्रोलच्या विक्रीवर प्रति लिटर मागे 2.58 ते 1.03 रुपये मार्जिन मिळते . तर डिझेलच्या विक्रीवर आपणांस प्रति लिटरमागे 1.65 ते 0.60 रुपये मार्जिन मिळते . याशिवाय आपल्याला ऑइल विक्री करता येते यांमध्ये आपल्याला 20 टक्के पर्यंत मार्जिन मिळते . याशिवाय आपल्याला किटक नियंत्रण आषधे , शती उपकरणे , अशा वस्तु विक्रीचा परवाना देखिल प्राप्त होतो .
जागेची आवश्यकता : पेट्रोल पंप डिलरशिप घेण्यासाठी सिंगल साठी 800 square meter तर डबल युनिट साठी 800 square meter जागेची आवश्यकता लागते .
आवेदन कसा कराल ? : आपण जर किसान सेवा केंद्र योजना अंतर्गत पेट्रोल पंप डिलरशिप घेवू इच्छित असाल तर आपल्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या ठिकाणी डिलरशिप ओपन झालेली आहे , ते क्षेत्र पाहावे व ऑनलाईन पद्धतीने Indian oil corporation च्या https://iocl.com/pages/ro-ksk-dealerships-overview या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोटीफिकशेन पाहुन आवेदन सादर करुन शकता ..