Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pension / Family Pension Document ] : राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर तसेच कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर कर्मचाऱ्यांना वारसदारांना निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
निवृत्ती वेतन : कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना कुटुबाचा तपशिल नमुना क्र.03 भरुन द्यावा लागतो . तसेच विहीत नमुन्यातील नमुना सही , पती पत्नी एकत्रित फोटो सह बँकेच्या पासबुकाच्या प्रथम पानाच्या झेरॉक्स सह जोडावेत . तसेच ना – देय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहेत .
त्याचबरोबर ना चौकशी प्रमाणपत्र नमुना – 7 महालेखापाल यांचेकडे पाठवायाचे पत्र सादर करावेत लागतील . त्याचबरोबर अंशराशीकरण करीता अर्ज नमुना सादर करावे लागतील . तसेच भविष्य निर्वाह निधीचा अंतिम प्रदान भाग 1 व 2 सादर करावे , लागतील . तसेच गट विमा योजना लाभ मागणी आवेदन सादकरणे आवश्यक असतील . तसेच मूदतपुर्वी व स्वेच्छा निवृत्ती असल्यास आवश्यक कागतपत्रे सादर करणे आवश्यक आहेत .
कुटुंबनिवृत्ती वेतनासाठी आवश्यक कागतपत्रे : कुटुंब निवृत्ती वेतनासाठी नमुना – 12 , नमुना 16 – कुटुंब निवृत्ती वेतन गणना पत्रक ,नमुना 17 – महालेखापाल यांचेकडे पाठवायचे पत्र , तसेच ना देय प्रमाणपत्र , त्याचबरोबर गट विमा नामनिर्देशन व व्याजाचा नमुना अर्ज , तसेच भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशित व्याजाचा भाग सी मध्ये अर्ज ठेव संलग्न योजना अंतर्गत अनुज्ञेय असणारी रक्कम मिळविण्यासाठी अर्ज . अशा प्रकारचे कागतपत्र सादर करणे आवश्यक आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.