Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Nomination Rules ] : राज्य शासन सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पश्चात्य त्यांच्या कुटुंबियांना ( वारसदारांना ) सेवा लाभ / आर्थिक लाभ देण्यात येत असतात . या संदर्भातील कोणत्या नियमावली आहेत , याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

कर्मचाऱ्याची राज्य शासन सेवेमध्ये नियमित / सतत एक वर्षाची सेवा पुर्ण झाल्यास सदर कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय कुटुंबनिवृत्तीवेतनासाठी पात्र ठरतात ( कर्मचाऱ्याच्या मृत्युनंतर ) . याकरीता कर्मचाऱ्यांने नियम क्रमांक 115 ( 1) मधील तरतुदीनुसार मृत्यु नंतर निवृत्ती सेवा उपदान कोणास द्यावेत यासाठी नामनिर्देशन भरुन देणे आवश्यक असते .

विवाहित कर्मचारी : विवाहित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नामनिर्देशनावर त्याच्या कुटुंबामधील  कायदशिर वैवाहिक संबंधातून निर्माण होणारी संतती तसेच त्यांच्या पत्नीचा प्रथम हक्क असतो . यामुळे विवाहित कर्मचाऱ्यांने नामनिर्देशन देताना प्रथम पत्नी , मुलांचे नाव निर्देशित करणे आवश्यक असते . तर सदरचे नामनिर्देशन हे कार्यालय प्रमुखांकडून स्वीकृत केलेले असावेत . सदर स्वीकृती ही नामनिर्देशन सेवा पुस्तकांमध्ये लावण्यात आलेले असावेत .

अविवाहीत कर्मचारी : अविवाहीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणच्याही नावाने नामनिर्देशित होऊ शकेल परंतु त्याच्या विवाहानंतर नामनिर्देशन हे आपोआपच रद्द होवून त्याच्या कुटुंबीय पत्नी / मुलांच्या नावाने होईल .

कुटुंब निवृत्तीवेतनासाठी कर्मचाऱ्यांने सेवेत असताना विहीत नमुन्यामध्ये नमुना क्र.03 मध्ये कुटुंबाचा तपशिल कार्यालयांमध्ये सादर करणे आवश्यक आहेत . ज्यामुळे कुटुंब निवृत्ती वेतन कोणास द्यावेत असा प्रसंग उद्भवल्यास सदरचा लाभ कोणास द्यावेत याबाबत ठरविण्यासाठी अधिक सोयीस्कर होईल .यांमध्ये कुटुंबाच्या व्याख्येत न्यायीक फारक असणारी पती / पत्नीचा समावेश होतो . यावेळी न्यायालयीन फारकत झालेल्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियामधील पती / पत्नीस सदर लाभ अनुज्ञेय होईल . परंतु घटस्फोट मंजूर झाल्याच्या प्रकरणी कुटुंबनिवृत्तीवेतनाचा लाभ प्राप्त होत नाहीत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *