Live Marathipepar संगिता पवार प्रतिनीधी [ SCSS Post Office Saving Scheme ] : आपण जर ज्येष्ठ नागरिक असाल तर आपल्या नावाने किंवा आपल्या घरांमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत , त्यांच्या नावे पोस्ट ऑफीस मध्ये SCSS बच योजना अंतर्गत गुंतवणुक केल्यास आपल्याला सर्वाधिक आर्थिक लाभ होईल .
ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये इतर बँकातील बचतीपेक्षा सर्वाधिक लाभ मिळत असतो . या बचत योजनेमध्ये आपण जर पैसे गुंतवले तर आपणास ठेवीवर दरमहा 8.2 टक्के इतका व्याजदर मिळतो . तर आपण या बचत योजनेमधून मुदतपुर्वी पैसे काढले तर , अतिरिक्त चार्जेस लागतील . हे व्याजदर बदलत असतात , परंतु इतर बचत योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याजदर हे नेहमीच अधिक असते .
ज्येष्ठ नागरिक याचा अर्थ ज्यांचे वय हे 60 वर्षांपेक्षा अधिक आहेत , असे सर्व नागरिक या बचत योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास पात्र ठरतील . आपण जर या बचत योजनांमध्ये 50,000/- रुपये 5 वर्षांसाठी गुंतवले तर तर आपणांस वार्षिक 4100/- रुपये प्राप्त होतील , तर पाच वर्षांचा विचार केला असता ही रक्कम 20,500/- इतकी रक्कम व्याज मिळेल , तर एकुण रक्कम ही 70,500/- रुपये इतकी मिळेल .
सन 2023 पासुन या बचत योजनांमध्ये कमाल 30 लाख रुपये पर्यंत गुंतवणुक करु शकता . ही कमाल मर्यादा पुर्वी 15 लाख रुपये इतकी होती . आपण या योजनंमध्ये एकदाच गुंतवणुक करुन दरमहा , तिमाही स्वरुपात व्याजाची रक्कम प्राप्त करु शकतो . तर या योजनांमध्ये पाच वर्षे इतके कालावधीकरीता गुंतवणूक करावी लागते . जर मुदतपुर्व पैसे काढल्यास चार्जेस लागतील .
या बचत योजनांमध्ये बचत केल्यास , आपणांस इतर ठेवी पेक्षा अधिक लाभ मिळेल , यामुळे पोस्टाच्या या बचत योजनांमध्ये गुंतवणुक करणे ज्येष्ठ नागरिंकास अधिक लाभ दायक ठरेल ..