Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Toll Collection New GPS Method News ] : केंद्र सरकारकडून येत्या महिन्यापासून टोल जमा करण्याची नविन पद्धत अंमलात आणणर आहेत , यामुळे जुनी फास्टॅग पद्धत ही इतिहासजमा होणार आहे . ही पद्धत प्रथम देशातील काही प्रमुख महामार्गावर करण्यात येणार आहेत , त्यानंतर देशातील सर्व महामार्गावर करण्यात येणार आहेत .

रस्ते मंत्रालयातील रस्ते सचिव श्री अनुराग जैन यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार प्रथम देशातील 10 महामार्गांवर GPS टोल चाचणी पुढच्या माहे फेब्रुवारी 2024 पासून घेण्यात येणार आहेत . या जीपीएस टोल वसुली मुळे बऱ्याच वेळ वाचणार आहे . अशा प्रकारची GPS टोल प्रणाली अमेरिका , इंग्लंड अशा युरोपिय देशांमध्ये वापरण्यात येते . ही प्रणाली आता देशांमध्ये वापर करण्यात येत आहेत .

GPS प्रणालीद्वारे चालत्या वाहनातुन टोल कापला जाईल : या जीपीएस टोल प्रणालीमध्ये चालत्या वाहनांचे टोल कापला जाईल . हे टोल अंतरानुसार टोल कापला जाईल . यांमध्ये एक्झिट पॉइंटवर प्रवास केलेल्या अंतरानुसार टोल असणार आहेत . म्हणजेच एखाद्या प्रवाशाने कमी अंतर प्रवास केला असेल तर त्याचा जीपीएस प्रणालीमध्ये कमी टोल कापला जाईल , तर जास्त अंतरासाठी ,अंतरानुसार जास्त टोल कापला जाईल .

याकरीता वाहनधारकांना आपल्या वाहनांची व स्वत : नोंद तसेच बँक खात्याशी जोडावे लागणार आहेत . यामुळे आता मोटार वाहन कायद्यामध्ये देखिल सुधारणा करण्यात येणार आहेत , या प्रणाली मुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही , व प्रवासाचा वेळ देखिल वाचणार आहे . फास्टॅग प्रणालीमध्ये देखिल काही तांत्रिक अडचणीमुळे अनेकदा वेळ लागत असल्याच्या तक्रारी येत होत्या , त्यामुळे ही नविन जीपीएस प्रणाली अंमलात आणली जात आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *