Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Ram Mandir 22 January National Holiday News ] : दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी देशामध्ये राम मंदीराच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त दिवाळी साजरा करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी कडून देण्यात आलेले आहेत . राममंदीर प्राणप्रतिष्ठा ही देशातील जनतेसाठी मोठा आनंदाची बातमी आहे .
भारतीय हिंदु संस्कृती मध्ये श्रीरामाचे खुप मोठे महत्व आहेत . दिवसापासून ते रात्री पर्यंत हिन्दु बांधव निदान 50 वेळा श्रीरामाचे नाव घेत असतो , जर कोणी भेटला तर रामराम / जय श्रीराम करण्याची पद्धत आज देखिल भारतामध्ये आहे . यामुळे भारतीय हिन्दुच्या बाबतीत रामाचे मोठे महत्व आहेत . यामुळे अयोध्यामध्ये दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा होत असल्याने , देशातील काही राज्य सरकारने शासकीय सुट्टी जाहीर केली आहे .
महाराष्ट्र राज्य सरकार देखिल या दोन दिवसांमध्ये दिनांक 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करेल , तर राम मंदी प्राणप्रतिष्ठा निमित्त केंद्र सरकारकडून देखिल सुट्टी जाहीर करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे , यामुळे देशांमध्ये राष्ट्रीय सुट्टी जाहीर होण्याची मोठी शक्यता आहे .
या प्राणप्रतिष्ठा निमित्त सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना बार कौन्सिल ऑप इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा पत्र लिहून म्हटले आहेत कि , दिनांक 22 जानेवारी रोजी देशातील सर्व उच्च् न्ययालये आणि जिल्हा न्यायालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात यावित . ज्यामुळे न्यायालयातील वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास उपस्थिती लावू शकतील .
काही राज्यांमध्ये ड्राय डे ची घोषणा : राजस्थान राज्य सरकारने दिनांक 22 जानेवारी रोजी ड्राय डे ची घोषणा करण्यात आलेली आहे तसेच छत्तीसगड राज्य सरकारने रेस्टॉरंट पब आणि क्लब बंद ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत . त्याचबरोबर हरियाणा मध्ये देखिल मनोहर लाल सरकारने राज्यात ड्राय डे ची घोषणा करण्यात आलेली आहे . यामूळे सदर राज्यातील सर्व दारुची दुकाने ही बंद असणार आहेत .