Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतनिधी [ State Employee Old Pension Scheme , R.D.Nikam Sir Stike ] : सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.आर डी निकम सर हे एनपीएस कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करण्यात यावी या प्रमुख मागणीकरीता , नुकतेच मुंबई ते दिल्ली अशी सायकल यात्रा काढली होती . आता आर डी निकम सर 15 जानेवारी पासून जुनी पेन्शन साठी आमरण उपोसणास सुरुवात केली आहे .

प्रमुख मागण्या : राज्यातील राष्ट्रीन निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावेत . राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी ज्यांची नियुक्ती ही सन 2005 पुर्वी झालेली आहे , परंतु त्याच्या शाळांस 2005 नंतर अनुदानास मान्यता मिळाली आहे , अशांची सेवा ही 2005 पुर्वी ग्राह्य धरुन सदर शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करण्यात यावित .

यासह इतर 10 मागण्यांसाठी दिनांक 15 जानेवारी पासून आर. डी. निकम सरांनी आमरण उपोषणांस नाशिक विभागीय आयुक्तालय सुरुवात केली आहे . आर डी निकम सर हे जुनी पेन्शन बहाल करण्याकरीता पहिल्या पासूनच प्रयत्न करीत आहेत . त्यांनी मुंबई ते दिल्ली असा सायकल यात्रा सर्वांना लक्ष वेधनिय प्रेरणा असेल . सध्या नाशिक येथे मोठ्या प्रमाणात थंडी असताना देखिल , अशा थंडीमध्ये देखिल त्यांना आपल्या जिवाची पर्वा न करता एनपीएस धारकांसाठी लढत आहेत .

आर डी निकम सर यांना सदर उपोषणांस महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ ( फेडरेशन ) नाशिक विभाग माध्यमिक शिक्षक संघ , नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ , नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी ( टीडीएफ ) तसेच नाशिक जिल्हा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा दिलेला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *