Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Post Office Public Providend Fund Scheme ] : आपणास जर 15 वर्षांमध्ये लखपती व्हायचे असल्यास , दर महीन्याला पोस्ट ऑफीसच्या पब्लीक प्रोव्हिडंट फंड मध्ये गुंतवणूक केल्यास , आपणास तब्बल 40 लाख पर्यंत लाभ मिळणार आहे . ज्यामुळे आपले लखपती होण्याची स्वप्न पुर्ण होईल .
देशातील सर्वसाधारक नागरिकापर्यंत ते श्रीमंत , नोकरदार सर्वांसाठी पोस्टाची ही योजना खुली आहे , या योजनेमध्ये आपण दरमहा पद्धतीने गुंतवणुक करु शकता . PPF अर्थात पोस्टाची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा एक प्रकारचा फंड असल्याने , यामधील गुंतवणकीवर केंद्र सरकारकडून सध्या 7.1 टक्के दराने व्याज दिले जाते , हे व्याजदर दरवर्षी बदलण्यात येत असतात .
या गुंतवणुक योजनेचे खास वैशिष्ट्ये : या पोस्टाच्या गुंतवणूक योजनेमध्ये 50 च्या पटींमध्ये गुंतवणुक करावी लागेल , तर किमान 500/- रुपये दरमहा पद्धतीने गुंतवणुक करावी लागेल . तर कमाल वार्षिक गुंतवणुक ही 150,000/- रुपये पेक्षा अधिक होणार नाही अशा , पद्धतीने गुंतवणुक करता येईल .म्हणजेच या योजनेमध्ये आपण दरमहा 12,500/- कमाल गुंतवणुक करु शकतो .जर आपण 12500/- रुपये कमाल रुपये गुंतवणूक केल्यास , आपणास पुढीलप्रमाणे लाभ अनुज्ञेय होईल .
आपण जर या पोस्टाच्या PPF खात्यांमध्ये कमाल 12500/- रुपये दरमहा गुंतवणुक केल्यास आपणास 15 वर्षानंतर ( After Maturity Date ) 39,44,600/- रुपये इतका लाभ मिळेल यांमध्ये आपली एकूण गुंतवणूक रक्कम ही 22,50,000/- रुपये इतकी होईल , तर आपणास 16,94,600/- रुपये इतका व्याज मिळेल .याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे मुदत अंती मिळणाऱ्या रक्कमेवर आयकर लागत नाही .