Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee IMP GR ] : आखिल भारतीय सेवा ( कार्यमुल्यांकन अहवाल ) नियम 2007 हे भारतीय भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी सन 2007-08 या वर्षापासून लागू करण्यात आलेले आहेत . या नियमाप्रमाणे 40 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांनी वरील नियमानुसार ,विहीत केलेल्या वैद्यकीय तपासण्या प्रतिवर्षी करुन घेणे बंधनकार असून , त्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या अहवालाचा सारांश , वार्षिक कार्यमुल्यांकन अहवालासोबत जोडणे आवश्यक असते .
सन 2023-24 या वर्षी राज्यातील 40 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांची आखिल भारतीय सेवा नियम , 2007 नुसार विहीत केलेल्या वैद्यकीय तपासणी करण्या संदर्भात पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार आखिल भारतीय सेवा नियम 2007 मधील नियम 3 व त्यासोबतचा नमुना 4 अ नुसार दिनांक 31 मार्च 2023 रोजी 40 वर्षे किंवा अधिक वय असणाऱ्या राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी त्यांची विहीत वैद्यकीय तपासणी , चालु वर्षी या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्र अ मध्ये नमुद केल्यानुसार महसूल विभाग निहाय निश्चित केलेल्या खाजगी रुग्णालयातुन किंवा शासकीय / महानगरपालिका रुग्णालयातुन करुन घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर वैद्यकीय तपासणी करताना महाराष्ट्र राज्य संवर्गातील दिनांक 31 मार्च 2023 रोजी 40 वर्षे किंवा अधिक वय असलेल्या भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या महसूली विभागासाठी प्रपत्र अ मध्ये दर्शविलेल्या खाजगी रुग्णालयातुन / वैद्यकीय संस्थामधून सदर निर्णयांमध्ये नमुद केलेल्या सर्व वैद्यकीय तपासण्या चालु वर्षी सन 2023-24 मध्ये करुन घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून दिनांक 31 मार्च 2024 पर्यंतच्या कालावधीत भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णालयांशी परस्पर संपर्क साधून वैद्यकीय तपासणीच्या तारखा निश्चित करुन घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .यासंदर्भातील राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 16.01.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.