Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Child Life Insurance Plan ] : आजच्या युगांमध्ये मुलांच्या भवितव्याचा विचार करीत असाल तर , आजच्या आपल्या मुलांच्या नावाने पोस्ट ऑफीस मध्ये फक्त 6/- रुपयांपासून गुंतवणूक करु शकता . या गुंतवणुक योजना बाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये घेवूयात ..

चाइल्ड लाईफ इन्शुरन्स प्लॅन : यांमध्ये आपण वय वर्षे 5 ते 20 वर्षे वयोगटातील मुलांसाठी गुंतवणूक करु शकणार आहात . तर ही पॉलिसी पालक आपल्या कमाल 02 मुलांसाठी खरेदी करु शकतो . तर तिसऱ्या मुलांसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करता येत नाही . तर या योजनेत मुलांचे पालक हे आपल्या लहान मुलांच्या नावाने खरेदी करु शकतील .

फक्त 6/- रुपये दररोज करा गुंतवणुक : या चाइल्ड पॉलिसीमध्ये आपण दररोज फक्त 6/- रुपये प्रमाणे ते 18 रुपये पर्यंत प्रिमियम जमा करु शकता . म्हणजेच आपण जर 5 वर्षांसाठीच्या ही पॉलिसी खरेदी केली असता , आपणांस फक्त दररोज 6/- रुपये प्रिमियम भरावा लागेल तर आपण 20 वर्षांच्या कालावधीकरीता खरेदी केली असता , आपणास दररोज 18/- रुपये प्रिमियम हप्ता भरावा लागेल .

पॉलिसीधारकाच्या मृत्युनंतर प्रिमियम होईल माफ :  यांमध्ये पॉलिसीधारक हे पालक असतील , यामध्ये पोलिसीधारक पालकाचा मृत्यु झाल्यास , विम्याचा लाभ मॅच्युरिटी नंतर मिळते . अशा पद्धतीने आपण जर गुंतवणुक केल्यास मॅच्युरिडी संपल्यानंतर 1 लाख रुपये पर्यंत लाभ दिले जाते . ज्यामुळे मुलांचे शिक्षणासाठी पैसा उपयोगी पडेल .

या पॉलिसीमध्ये गुंतवणुक करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफीसशी संपर्क साधावा , व आपल्या वय वर्षे 05 ते 20 वर्षापर्यंतच्या मुलांच्या नावाने चाइल्ड विमा पॉलिसी काढावी ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *