Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Electric Motar , Subsidy News ] : आता यापुढे इलेक्ट्रिक वाहनांवर चक्क 75 टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहेत . यासाठी तुम्ही पात्र आहात का , व कशा पद्धतीने आवेदन करता येईल यासाठी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
सध्या पाहीले तर वायु प्रदुषण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत , अशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढल्यास निश्चितच वायु प्रदुषणास मोठ्या प्रमाणात आळा बसेल . या करीता सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी जाहीर करण्यात येत आहेत . यांमध्ये केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान जाहीर करण्यात येत आहेत . यांमध्ये राज्य शासनांतर्फ आपणांस चक्क 75 टक्के पर्यंत अनुदान जाहीर करण्यात येत आहेत .
यांमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश अग्रेसर राज्य असून , येथे इलेक्ट्रिक वाहनांवर चक्कम 75 टक्के पर्यंत अनुदान जाहीर करण्यात येत आहेत . जे इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक सबसिडी आहे . तर इतर राज्यांपेकी महाराष्ट्र , मध्य प्रदेश , राजस्थान , हरियाणा आणि पंजाब या राज्य सरकारने देखिल इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर 50 टक्के पर्यंत अनुदान जाहीर केले आहेत .
जर आपण महाराष्ट्र राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यास आपणांस मोटार सायकल वर 10,000/- रुपये पर्यंत तर तीन चाकी इलेक्ट्रीक वाहनांवर 30,000/- रुपये पर्यंत तर चारचाकी वाहनांवर तब्बल 1.50 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळत आहेत . ही योजना या पुर्वी राज्य कर्मचाऱ्यांकरीता लागु होती , आता ती इतर सर्वसामान्यांसाठी लागु करण्यात आलेली आहे .
अनुदानाचे स्वरुप : आपण जर नविन वाहन खरेदी करतो , त्यावेळी आपणांकडून अनेक प्रकारचे टॅक्स सरकारकडून वसूल करण्यात येते , आता यांमध्ये वरील प्रमाणे सुट दिली जाते , यामुळे आपणांस इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास सरकारकडून कमी कर घेत असल्याने अनुदान मिळते .