Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Makar Sankranti Information ] : भारतीय संस्कृती मध्ये सर्वच सणाचे काहीतरी धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहेत . धार्मिक परंपरेनुसार भारतीय लोक मकर संक्रांतीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात , या सणाचे महत्व नेमके काय आहेत . याबाबत सविस्तर माहिती या लेखात घेवूयात ..

संक्रांत म्हणजे सुर्य ज्यावेळी एका राशीतुन दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करणे . ज्यावेळी सुर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी भारतांमध्ये मकर संक्रांती हा सण साजरा करण्यात येतो , या वर्षी मकर संक्रांती हा सण दिनांक 15 जानेवारी रोजी आला आहे . मकर राशींमध्ये प्रवेश करताच भारतीय भूभागांमध्ये उन्हाळा ऋुतुस सुरुवात होत असते .

यावेळी सुर्याचे दक्षिण ते उत्तर गोलार्धात मध्ये फिरतो , या वेळी धार्मिक मान्यतेनुसार देवतांचे दिवसांची सुरुवात होत असते . तसेच या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात , म्हणूनच या दिवशी करण्यात येणारे दानधर्म हे इतर दिवसांमध्ये केलेल्या दानांपेक्षा अधिक लाभदायक असते .शिवाय धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी आपण जर शुद्ध तूप आणि शाल यांचे दान केल्यास आपणांस मोक्षप्राप्त होते . महाभारतांमध्ये देखिल भीष्म पितामह यांनी आपल्या देहाचे त्याग करण्याकरीता देखिल याच दिवसाची निवड केली होती .

वैज्ञानिक कारण : सुर्याचे उत्तरायण सुरु झाल्योन आपल्या प्रकृती मध्ये अचानक बदलाव होतो . म्हणजेच थंडीने गारठलेल्यांना सुर्याचे दर्शन होते , यावेळी थंडीपासून अचानक उन्हाचे प्रमाण अधिक होते , यामुळे अचानक होण्याऱ्या प्रकृतीच्या बदलांमध्ये आपल्या मानवी शरीरांमध्ये बदल होवून प्रकृती बिघडू नये याकरीता भारतांमध्ये या दिवशी तीळ आणि गुळांचे सेवण करतात . कारण तीळ आणि गुळांमध्ये उन्हांपासून शरीराचे बचाव होण्यास मदत होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *