Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Scheme – Hostel Allowance ] : महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणाऱ्यां विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळाल्यास ,त्या विद्यार्थ्यांना डॉ.पंजाबराव देशमुख्य वसतिगृह निर्वाह भत्ता खाली नमुद अटींच्या अधिन राहून 60,000/- रुपये इतकी रक्कम अदा करण्यात येते .
आर्थिकद्ष्ट्या दुर्बल घटकातील गरीब विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळाल्यास त्यांनाच या योजनांतर्गत निर्वाह भत्ता अदा करण्यात येत असतो . याकरीता विद्यार्थ्यांना राज्यातील कोणत्याही उच्च व तंत्रशिक्षण विभाग अंतर्गत मान्यताप्राप्त शासकीय , विनाअनुदानित / अनुदानित / कायम विना अनुदानित महाविद्यालये तसेच तंत्रनिकेतने , शासकीय विद्यापीठे खासगी अभिमत विद्यापीठांमध्ये मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतला असणे आवश्यक आहेत .
तसेच विद्यार्थ्यांचे पालकाचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा अधिक असू नयेत . विद्यार्थी हा गुणवत्तेच्या आधारावर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असणे आवश्यक आहे . तसेच निर्वाह भत्ता हा अभ्यासक्रमाच्या कालावधीपुरताच मिळतो , जर विद्यार्थी हा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला निर्वाह भत्ता मिळत नाही . एका कुटुंबामध्ये 02 मुलांपर्यंत ह्या योजनेचा लाभ घेवू शकतात .
जर विद्यार्थ्याने त्याच्या राहत्या गावात / शहरात असलेल्या संस्थामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतला असल्यास , त्यास निर्वाह भत्ता मिळणार नाही . तसेच सदर विद्यार्थ्यास अन्य योजनाखाली निर्वाह भत्ता मिळत असल्यास , त्यास सदर योजना अंतर्गत निर्वाह भत्ता मिळणार नाही .
वसतिगृह निर्वाह भत्याचे स्वरुप : या योजना अंतर्गत विद्यार्थ्यास भोजन भत्ता करीता 32000/- रुपये, निवास भत्ता करीता 20,000/- रुपये तर निर्वाह भत्ता म्हणून 8,000/- रुपये याप्रमाणे 60,000/- रुपये वसतिगृह भत्ता देण्यात येते . या योजनाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीडी पोर्टलवरुन ऑनलाईन आवेदन सादर करता येईल .