शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना , इतिहासजमा होणार ? जाणून घ्‍या आत्ताची नविन अपडेट !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Old Pension New Update News ] : देशभरातील राष्ट्रीय पेन्शन योजनाधारक सरकारी कर्मचारी एकीकडे जुनी पेन्शन मिळावी याकरीता लढा देत आहेत , तर सरकारकडून ही जुनी पेन्शन योजना इतिहासजमा करण्याच्या तयारीत लागले आहेत . या संदर्भातील आत्ताची नविन अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना परत  जुनी पेन्शन योजना ( Old Pension ) लागु करणेबाबत , केंद्र सरकारकडून गठीत सोमनाथन समितीचा अहवाल माहे जानेवारी महिन्यांच्या शेवटी केंद्र सरकारकडे सादर होण्याची मोठी शक्यता आहे . सदर अहवालांमध्ये नेमके काय आहे याकडे देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे , विशेषत : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर नविन पेन्शन प्रणाली लागु होणार असल्याने , राज्यातील कर्मचाऱ्यांची मोठी अपेक्षा या अहवालावर आहे .

देशातील एनपीएस धारक कर्मचारी परत जुनी पेन्शन लागु करावी याकरीता आंदोलन करीत आहेत , यामुळे केंद्र सरकारकडून गठीत सोमनाथन समितीकडून अहवाल मागविण्यात येत आहेत . मिळालेल्या माहितीनुसार , या समितीने जुनी पेन्शन ( Old Pension Scheme ) इतिहासजमा करण्याची शिफारस केंद्र सरकारला केल्याची माहिती समोर येत आहे . तर एनपीएस धारकांना यापुर्वी निश्चित करयात आलेला परतावा मिळेल , अशी तरतुद केल्याचे इकॉनोमिक टाईम्सच्या वृत्तांमध्ये स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत .

शिवाय सदर पेन्शन संदर्भातील बदलण्यात येणारे अथवा कोणते बदलाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत , त्याबाबत दिनांक 01 फेब्रुवारीला अर्थसंकल्पांमध्ये तरतुद करण्यात येणार असल्याचे वृत्तांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . शिवाय इकॉनिक टाईम्समधील स्पष्टीकरणांनुसार सदर सोमनाथन समिती असे सांगितले आहेत कि , जर भविष्यात जुनी पेन्शन लागु केल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेला खिळ बसण्याची शक्यता आहे असे नमुद केले आहेत . तर जुनी पेन्शन योजना लागु न करता कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नविन पेन्शन योजनांध्येच काही उचित बदल करण्याची शिफारस सदर सोमनाथन समितीने केली असल्याची माहिती समोर येत आहे .

RBI बँकेचा इशारा : भारतीय रिझर्व्ह बॅकेंने मागील महिन्यांत दिलेल्या इशारानुसार , जुनी पेन्शन ( Old Pension ) लागु केल्यास अर्थव्यवस्थेला काही पाऊले मागे नेल्यासारखे ठरेल असे नमुद केले आहेत . यामुळे विद्यमान सरकारकडून जुनी पेन्शन योजना इतिहासजमा होण्याची शक्यता आहे . असे असताना देखिल हिमाचल प्रदेश राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल केली आहे . तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा विचार केला असता , केंद्र सरकार पेन्शन योजनांमध्ये जो बदल करेल तो बदल राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात येईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment