Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Government Employee Penison rules ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन स्वरुपात शासन सेवा केल्याबद्दल आर्थिक मोबदला देण्यात येत असतो .निवृत्तीवेतन निश्चित करत असताना , सेवा कालावधीनुसार निश्चित करण्यात येत असते , यांमध्ये कोणत्या सेवा गृहीत धरले जातात व कोणत्या गृहीत धरल्या जात नाहीत . याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
निवृत्तीवेतनासाठी गृहीत धरण्यात येणारी सेवा : राज्य शासन सेवेत पुर्ण वेळ व वेतनश्रेणीत नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांची अस्थायी आणि स्थायी अशा स्वरुपांमध्ये सेवा ठरत असते . कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या कर्तव्य कालावधी अर्हताकारी सेवा म्हणून गणले जाते . यांमध्ये पदग्रहण कालावधी व प्रशिक्षणाचा कालावधी व स्वियेत्तर सेवा कालावधी देखिल गणला जात असतो .
तर असाधारण रजा व इतर सर्व प्रकारच्या रजेचा कालावधी , तसेच परिविक्षाधीन व अस्थायी सेवा कालावधी निवृत्ती वेतर्नाह सेवा म्हणून ग्राह्य धरले जाते . एखादा कर्मचारी हा शासनांच्या नियंत्रिक स्थानिक संस्था अथवा केंद्र शासनाच्या सेवेतून कोणत्याही प्रकारेच खंड न पडता राज्य शासन सवेमध्ये आला असेल त्याची पुर्वीच्या सेवा काही अटींवर ( वित्त विभागाच्या दिनांक 04.04.1983 रोजीच्या निर्णयानुसार ) अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येते .
गृहीत न धरली जाणारी सेवा : यांमध्ये माहे फेब्रुवारी 2001 नंतर घेण्यात आलेल्या विद्यकीय कारणाशिवाय घेतली जाणारी बिनपगारी रजा ही अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरली जात नाही . तसेच निलंबन कालावधीमध्ये निलंबन म्हणून समजण्यात आल्यास तो कालावधी हा अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरली जात नाही .
तसेच एखादा कर्मचारी हा 18 वर्ष पुर्ण होण्याच्या अगोदरच सेवेत आल्यास अशा वेळी त्याचे 18 वर्षे पुर्ण होण्या अगोदरची सेवा कालावधी हा अर्हताकारी सेवा म्हणून धरला जात नाही . तसेच शिकाऊ उमेदवार म्हणून केलेल्या सेवा ह्या अर्हताकारी सेवेचा भाग होत नाहीत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.