Spread the love

लाईव्ह मराठी पेपर ,संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जून महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत 7 व्या वेतनाच्या फरकाचा 4 था हप्ता अदा करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .असे असताना राज्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिलाच हप्ता प्राप्त झालेला नाही , यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसून येत आहे .

राज्य शासन सेवेतील जिल्हा परिषदा , खासगी प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय प्राध्यापक आदी शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा मिळालेला नाही .यासाठी सदर कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन हक्क संघटनेस सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते मिळणेबाबत मागणी सादर केली आहे .

सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने मंत्रालयांमध्ये पाठपुरावा केला आहे . वरील नमुद कर्मचाऱ्यांना जुन महिन्यांच्या वेतनासोबत सातव्या वेतन आयोग फरकाचे उर्वरित सर्व हप्ते व चौथा हप्ता अदा करण्यात यावेत , अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन / थाळीनाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने दिला आहे .

हे पण वाचा : जून महिन्याच्या वेतानासोबत 1,2,3 व 4 हप्ता मिळणेबाबत पत्रक !

राज्य शासनांकडून सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करणेबाबत वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित होवूनही निधी अभावी राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला , दुसरा व तिसरा हप्ता अदा करण्यात आला नाही . यामुळे सदर देयकासाठी जुन महिन्यात निधी उपलब्ध करुन देण्यात यावी असे संघटनेचे वतीने निवेदन देण्यात आलेले आहेत . अन्यथा जुलै 2023 मध्ये राज्यभर तिव्र आंदोलन / थाळीनाद आंदोलन करण्याचा मोठा इशारा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने राज्य शासनास दिले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी अथवा पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *