Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Asahakar Stike ] : येत्या एप्रिल – मे महिन्यांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत , या निवडणुकापुर्वीच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी अन्यथा राज्यातील कर्मचारी असहकार आंदोलन करतील अशा इशारा जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य संघटनेने दिला आहे .
असहकार आंदोलनांमध्ये सरकारची कोणत्याही प्रकारची कामे केली जाणार नाहीत , यांमध्ये चक्क निवडणुक कामकाजांवरच बहिष्कार तसेच जणगणना असे राष्ट्रीय काम कर्मचाऱ्यांशिवाय होणे शक्य नाहीत . यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या निवडणुकांपुर्वीच पुर्ण कराव्यात अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आलेली आहे .
वेळोवेळी राज्य शासनांकडून जुनी पेन्शन लागु करण्याचे आश्वासने दिले जातात , परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय घेतले जात नाहीत , नेहमीच समितीचे गठण केले जाते . व वेळ पुढे ढकलली जाते , यांमध्ये कर्मचाऱ्यांची निराशा कायम राहते , यामुळे कर्मचारी यावेळी असहकार आंदोलन करण्यात आहेत , याकरीता मुंबई येथे लवकरच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न होणार आहे .
राज्य सरकार हे जुनी पेन्शन निर्णय घेण्याकरीता केंद्र शासनाच्या निर्णयावर आधारीत भुमिका घेत आहे . केंद्र सरकारने अद्यापर्यंत पेन्शन बाबत भुमिका स्पष्ट केली नाही , यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरीता देखिल जुनी पेन्शनचा निर्णय रेंगाळत चालला आहे .
जर राज्य सरकारने निवडणुकांपुर्वी जुनी पेन्शन लागु न केल्यास , या निवडणुकांमध्ये राज्यातील 17 लाख कर्मचारी व त्यांचे कुटुबिय जुनी पेन्शन लागु करणाऱ्या पक्षाला मत करणार आहे , याकरीता वोट फॉर ओपीए प्रशिक्षण पुस्तिकांचे वाटप कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.