Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee New Pay Commission ] : देशातील केंद्र सरकारच्या अधिनस्थ सरकारी कर्मचाऱ्यांना या अर्थसंकल्पांमध्ये नविन वेतन आयोग (New Pay Commission ) समितीची स्थापना करण्याची मोठी शक्यता आहे .
बजेटमध्ये होणार मोठी घोषणा : दिनांक 01 फेब्रुवारी 2024 रोजी मोदी सरकारचे शेवटचे अर्थसंकल्प असून केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत . हे अर्थसंकल्प असल्याने , यांमध्ये देशातील सर्वांनाच खुश करण्यासाठी तरतुदी करण्यात येणार आहेत . यांमध्ये देशातील तब्बल 50 लाख पेक्षा अधिक सरकारी कर्मचारी नविन वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत आहेत , त्यामुळे नविन वेतन आयोग समितीची स्थापना केल्यास आगामी निवडणुकीमध्ये निश्वितच विद्यमान सरकारला फायदा होणार आहे .
नविन वेतन आयोगाची स्थापना याच वर्षी : दर 10 वर्षानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करण्यात येत असतो , तर मागील वेतन आयोगांचा विचार केला असता , वेतन आयोग लागु करण्यापुर्वी वेतन आयोगामध्ये नविन वेतनश्रेणी , आर्थिक विश्लेषण सांख्यिकी विवरण यांचा सविस्तर अहवाल तयार करण्याकरीता दोन वर्ष अगोदरच वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येते .
यामुळे या अर्थसंकल्पांमध्ये निश्चितच नविन वेतन आयोग स्थापन करणेबाबत , तरतुद करण्याची शक्यता आहे . यांमध्ये केवळ नविन वेतन आयोग ( 8 th Pay Commission ) समितीची स्थापना करण्यात येईल . यांमध्ये अध्यक्ष , सदस्य , सचिव यांची निवड करण्यात येईल . जे कि आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत अहवाल तयार करतील ..
किमान वेतनांमध्ये होईल वाढ : कामगार युनियनच्या मागणीनुसार कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 पट वाढ करण्याची मागणी होत असल्याने या प्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनांमध्ये 8,000/- रुपये तर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनांमध्ये 6,000/- रुपयांची वाढ होईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.